मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. “राज्यातील सहा-सात कलंकित मंत्र्यांना जावेच लागेल,” असा ठाम दावा करत राऊत ( संजय राऊतांचा दावा)यांनी सरकारच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह (फडणवीस-शहा गुप्तभेट)उपस्थित केले आहेत.
राज्यातील मंत्र्यांवरील आरोप, वसई महापालिकेतील १००० कोटी रुपयांचा घोटाळा, आणि फक्त दोन मंत्र्यांच्या खात्यांमध्ये झालेली फेरबदल यावरून राऊत म्हणाले, “ही केवळ थातूरमातूर कारवाई आहे. सरकार मंत्र्यांना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.”
राऊत यांचा दावा आहे की, फडणवीस यांनी स्वतः अमित शहा यांच्याशी दिल्लीमध्ये भेट घेऊन “अशा कलंकित लोकांबरोबर काम करणे अवघड आहे,” (फडणवीस-शहा गुप्तभेट) असे सांगितले. पण तरीदेखील कारवाईची फाईल पुढे सरकत नसल्याचा ( संजय राऊतांचा दावा) टोलाही त्यांनी लगावला.
सरकार कितीही रंगसफेदी करण्याचा प्रयत्न केला, तरीही डाग कायम राहतो, असे राऊत म्हणाले. क्रीडा खात्यात करण्यात आलेला बदल देखील त्यांनी “तात्पुरती व्यवस्था” म्हणत फेटाळून लावला.
सरकारची भूमिका अजूनही अनिश्चित
मंत्रिमंडळात बदल झाला असला तरी, जनतेच्या मनातील प्रश्न तसेच आहेत. सरकार कारवाई करत आहे की केवळ दिखावा? कलंकित मंत्र्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत का? (फडणवीस-शहा गुप्तभेट) राऊतांच्या दाव्यांवर सरकारकडून कोणती स्पष्ट प्रतिक्रिया दिली गेलेली नाही.
संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीत कितपत तथ्य आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांनी अनेकदा दिल्ली दरबारात घडलेल्या घडामोडींचा अचूक अंदाज लावल्याचे इतिहासात पाहायला मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे हे विधान सरकारसाठी राजकीय दबाव निर्माण करणारे ठरू शकते. मंत्री बदलांवरून सुरू झालेलं राजकारण आता महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली? फडणवीस विरुद्ध मंत्रिमंडळ? अशा स्तरावर पोहोचत आहे का, हे लवकरच स्पष्ट होईल.
|संजय राऊत | देवेंद्र फडणवीस अमित शहा भेट फडणवीस| महाराष्ट्र मंत्रिमंडळ वाद| संजय राऊत राजकीय आरोप