पुणे प्रभागरचना 2025 – सत्तासंरचना की नागरी विकास?

पुणे प्रभागरचना 2025: सत्तेचं गणित की पुणेकरांचा विकास?  

पुणे महानगरपालिकेची प्रभागरचना( पुणे प्रभागरचना 2025) सध्या अंतिम टप्प्यात आहे. पण, या प्रक्रियेत  राजकीय पक्षांची बांधिलकी जनतेशी आहे की सत्तेच्या गणिताशी हाच  खरा प्रश्न  आहे.

प्रभागरचना  (पुणे प्रभागरचना 2025)ही एक सुवर्णसंधी असते, ती म्हणजे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार सुविधा कशा पोहोचतील. रस्ते,पाणी,शाळा,आरोग्य, वाहतूक ,कचरा व्यवस्थापन  कसे सुधारतील याचे नीट नियोजन करण्याची. पण सध्याच्या घडामोडींवर नजर टाकली, तर ही संधी सत्तेच्या पायऱ्या मजबूत करण्यासाठी वापरली जात आहे.

प्रभागांची रचना करताना जिथे लोकसंख्या जास्त आहे तिथे अधिक प्रभाग निर्माण होणं अपेक्षित असतं. (pune-prabhagrachana-2025-vikas-ki-satta)पण काही ठिकाणी लोकसंख्या विचारात न घेता ‘विशिष्ट’ उमेदवार जिंकतील असे प्रभाग आखले जात असल्याच्या चर्चा रंगत आहेत. (पुणे प्रभागरचना 2025) मग निवडणूक आयोगाने जरी नियमावली दिली असली तरी, त्याची अंमलबजावणी राजकीय ‘प्रभावाखाली’ होत असल्याची शक्यता का नाकारता येणार नाही?

पुण्यातील कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, पार्किंगचा अभाव, सार्वजनिक शौचालयांची अवस्था आदी  सगळे  प्रश्न हे खरे प्रभागनिहाय (पुणे प्रभागरचना 2025)आहेत. पण या  प्रश्नांची चर्चाच  गायब आहे. कारण लक्ष केंद्रित आहे ते  “कोणत्या प्रभागात  कोण जिंकू शकेल?”

 भाजपसह सहकारी  पक्ष आणि विरोधी पक्ष हेही आपापल्या बालेकिल्ल्यांची रचना जशीच्या तशी ठेवण्यासाठी किंवा विरोधकांच्या प्रभाव असलेल्या भागात प्रभाग ‘फोडणी ‘करून ‘फायदेशीर विभाजन’ साधण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. मग ही प्रवृत्ती लोकशाहीच्या मूळ उद्दिष्टांनाच छेद देणारी आहे कि नाही हाही मुद्दा दुर्लक्ष करून चालणार नाही. (pune-prabhagrachana-2025-vikas-ki-satta) प्रभागरचनेचा खरा हेतू असतो तो म्हणजे  नागरी सुविधांचा समतोल विकास, गरजेनुसार नियोजन, आणि जनतेच्या गरजांचे प्रतिनिधित्व. मग प्रभागरचना ही जर पुणेकरांच्या विकासासाठी नसेल, तर ती केवळ निवडणुकीसाठी आखलेली एक राजकीय रणनीतीच म्हणावी लागेल.आज शहर वाढतंय, लोकसंख्या बदलतेय. त्यानुसार सर्वसमावेशक,पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रभाग रचना होणे  आवश्यक आहे;अन्यथा प्रत्येक निवडणुकीत प्रभाग ठरतील, पण पुणेकरांचे मूळ  प्रश्न मात्र तसेच कायम  राहतील. 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!