अमेरिकेने भारतावर २५ टक्के आयात कर (टॅरिफ) लादण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांतील नेत्यांनीही केंद्र सरकारवर टीका केली.
प्रियांका गांधी यांचा सवाल : मोदींच्या मैत्रीचे हेच फळ?
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटले की, “पंतप्रधान मोदी जगभरात फिरतात, मैत्री निर्माण करतात, पण त्याचे हेच फळ आहे का? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले हे साऱ्यांनी पाहिले आहे.”
जयराम रमेश यांचा सवाल,’नमस्ते ट्रम्प’चा उपयोग काय?
राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी विचारले, “’हाय मोदी’ आणि ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमांचे भारताला काय लाभ मिळाले? आज अमेरिका तिसरी मोठी समस्या बनली आहे. टॅरिफ हे आपल्या अर्थव्यवस्थेसाठी मोठे आव्हान आहे.”
राजीव शुक्लांचा सवाल : मैत्री कुठे गेली?
आम्ही ट्रम्पशी मैत्रीचा दावा करत होतो.आता तो कुठे आहे? ते म्हणतात की मोदी माझे मित्र आहे, पण २५ टक्के कर लादण्याचा त्याचा काय अर्थ आहे.असा सवाल काँग्रेसचे राजीव शुक्ला यांनी केला आहे. ट्रम्प देशांना धमकावत आहेत. ते भारताला रशियासोबत व्यापार करू नये असे सांगत आहेत. हे खूप चुकीचे आहे. अमेरिका भारताला पाठिंबा देत नाही. ते भारतावर अन्याय करत आहे. असे राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे.
२५% टॅरिफचा भारतावर परिणाम
अमेरिकेच्या नव्या धोरणानुसार, भारतीय वस्तूंवर २५ टक्के आयात कर लादण्यात आला आहे. याचा थेट परिणाम कापड, कृषी, ऑटोमोबाईल, व औद्योगिक निर्यात क्षेत्रावर होणार आहे. या निर्णयामुळे भारताची स्पर्धात्मकता कमी होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसंच, डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दरही दबावात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(Rahul Gandhi: BJP Destroyed Indian Econom)