खासदार सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
नवी दिल्ली । राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत तब्बल ₹४,८00 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे.
या प्रकरणी संपूर्ण राज्य सरकार जबाबदार असून, या घोटाळ्याची (ladki-bahin-yojana-4800-koti-ghotala) एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी त्यांनी जोरदार मागणी केली आहे. तसेच, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशीही त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
या प्रकरणी संपूर्ण राज्य सरकार जबाबदार असून, या घोटाळ्याची (ladki-bahin-yojana-4800-koti-ghotala) एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी त्यांनी जोरदार मागणी केली आहे. तसेच, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशीही त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना, सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “आई-वडिलांनंतर भाऊ-बहिणीचे नाते हे सर्वात पवित्र असते. पण या योजनेत (ladki-bahin-yojana-4800-koti-ghotala) सरकारने त्या नात्याचाही अवमान केला आहे. सरकारी योजनांच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत आहे आणि हजारो कोटी रुपयांचा अपहार झाला आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “या योजनेची श्वेतपत्रिका तातडीने प्रसिद्ध करावी, तसेच संपूर्ण व्यवहाराचे ऑडिट करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. जर राज्य सरकारने स्वतःहून चौकशी केली नाही, तर आम्ही हा मुद्दा संसदेत उपस्थित करून केंद्र सरकारकडे तपासाची मागणी करू.”
महायुती सरकारकडून या आरोपांवर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादळाची चिन्हे दिसू लागली आहेत.
पुरुषांच्या खात्यावर पैसे कसे गेले?
राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार २ कोटी ३८ लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र, त्यातील २६ लाख महिला म्हणजे सुमारे १० टक्के नंतर अपात्र ठरवल्या गेल्या. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या योजनेत काही पुरुषांच्याही खात्यावर पैसे जमा झाल्याचे समोर आले आहे. या योजनेसाठी आधार कार्ड, बँकेचे तपशील, ओळखपत्र यासारख्या कागदपत्रांची आवश्यकता असताना, पुरुषांचे अर्ज मंजूर कसे झाले? त्यांच्या खात्यात पैसे कसे जमा झाले? याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी परखड मागणी सुळे यांनी केली.विधानसभा निवडणुकीच्या 3 महिने अगोदर ही योजना आणली गेली. त्यानंतर सर्वांना लाभ देण्यात आले. मग त्यांना आत्ताच अपात्र का ठरवले गेले? हा थोडा थोडका नव्हे तर तब्बल ४ हजार ८00 कोटींचा भ्रष्टाचार आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
‘डिजिटल इंडिया’मध्ये इतकी चूक कशी?
“एखाद्या विद्यार्थ्याचे महाविद्यालयात प्रवेशासाठी गुण कमी पडले तर त्याचा फॉर्म रिजेक्ट होतो. विमा योजनेसाठी अर्ज केल्यानंतर थोडीशी माहिती चुकीची असेल तर तो नाकारला जातो. मग येथे पुरुषांचे अर्ज मंजूर होऊन पैसे कसे गेले? हे फक्त तांत्रिक चुकांमुळे घडले असे म्हणणे हास्यास्पद ठरेल.”असेही त्या म्हणाल्या.
|लाडकी बहीण योजना
| सुप्रिया सुळे
| महायुती सरकार
| ४८०० कोटी घोटाळा
|एसआयटी चौकशी