उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आमदारांची राज्यपालांकडे मागणी
मुंबई | महायुती सरकार स्थापन होऊन आठ महिनेही पूर्ण झाले नसतानाच, सरकारमधील काही मंत्री आणि महायुतीतील नेते त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अशा वक्तव्यांबरोबरच त्यांच्याकडून होत असलेल्या असंवेदनशील कृतींमुळे सरकारची (Maharashtra Political Crisis)डोकेदुखी वाढली आहे, नेमक्या याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील शिवसेना (ShivSena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदारांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन संबंधित मंत्र्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी राज्यपालांकडे केली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सरकारमधील काही मंत्र्यांच्या वर्तनावर तीव्र आक्षेप नोंदवला. भ्रष्टाचारात अडकलेले आणि समाजविरोधी वर्तन करणारे मंत्री व आमदार यांच्याविरोधात त्वरित कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.(महाराष्ट्र मंत्री बडतर्फ वाद)
राज्यपालांना सादर केलेल्या निवेदनात मंत्री संजय शिरसाठ, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री योगेश कदम आणि मंत्री नितेश राणे यांच्या विरोधातील गंभीर आरोपांचा उल्लेख करण्यात आला. संबंधित मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये, असंवेदनशील वागणूक आणि गैरव्यवहाराची माहिती आमदारांनी राज्यपालांसमोर सादर केली. शिवाय अशा मंत्र्यांची तात्काळ बडतर्फी करण्याची मागणी केली आहे.(Maharashtra Political Crisis)
याशिवाय, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडेही राज्यपालांचे लक्ष वेधण्यात आले. ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पातील कथित अनियमितता, हनी ट्रॅप प्रकरण, तसेच मीरा-भाईंदर महापालिकेतील भूसंपादन प्रक्रियेत झालेल्या संभाव्य गैरव्यवहाराबाबत सविस्तर माहिती या पत्राद्वारे देण्यात आली.|MaharashtraPolitics |महाराष्ट्र मंत्री बडतर्फ वाद