मुंबई | राज्यात महायुती सरकारची #महायुतीसरकार सत्ता स्थापन होऊन आठ महिने लोटले, तरीही जनता अजूनही दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची वाट पाहत आहे.MaharashtraPolitics
शेतकरी कर्जमाफी, महिलांना आर्थिक मदत, रोजगार निर्मिती यांसारखी निवडणुकीत अनेक गाजलेली आश्वासनं हवेतच विरली आहेत. याला आता आर्थिक अडथळ्यांची कारणं दिली जात असली, #आपलंसरकारकीआपत्तीसरकार तरी सरकारच्या MaharashtraPolitics
अडचणी केवळ आर्थिक नाहीत तर नेत्यांच्या वादग्रस्त वर्तनातून आणि असंवेदनशील कृतीतून त्या अधिक गडद होत चालल्या आहेत.
गेल्या महिनाभरात घडलेल्या काही घटनांनी सत्तेतील जबाबदारीचा अभाव स्पष्टपणे दिसून आला आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात महायुतीतील काही आमदार आणि मंत्र्यांनी केलेल्या कृतींमुळे#वादग्रस्तनेते केवळ विरोधक नव्हे, तर जनतेतही संतापाचं वातावरण पसरले.
गेल्या महिन्यातील काही घटना हेच अधोरेखित करतात की, केवळ आश्वासने पुरेशी नाहीत, तर सत्तेतील जबाबदारीही महत्त्वाची असते. मात्र गेल्या महिनाभरात घडलेल्या काही प्रसंगांनी महायुती सरकारची प्रतिमा #आपलंसरकारकीआपत्ती सरकार डागाळली आहे.
आमदार बबनराव लोणीकर,संजय गायकवाड,संजय शिरसाट आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्ये आणि कृतीमुळे महायुती सरकारला जनतेमधील रोषाला सामोरे जावे लागत आहे. आपले सरकार म्हणणाऱ्या महायुतीतील प्रमुख नेत्यांना आता आमदार आणि मंत्र्यांना खडेबोल सुनावण्याची वेळ ओढवली आहे.#वादग्रस्तनेते
“तुमच्या अंगावरचे कपडे आणि पायातली चप्पल सुद्धा सरकारमुळंच मिळत आहेत. तर तुझ्या बापाला पेरणीसाठी ६ हजार रुपये मोदींनीच दिले आहेत,” असं वादग्रस्त वक्तव्य बबनराव लोणीकर लोणीकरांनी केले होते . मात्र, त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद विधानसभेच्या सभागृहात देखील उमटताना दिसले.लोणीकर हे सतत आपल्या वादग्रस्त आणि रोखठोक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.जालन्यातील परतूर इथे सोलर योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात बबनराव लोणीकरांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं त्यांच्यावर आणि सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले.
पावसाळी अधिवेशनात विविध प्रश्नावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरत असताना अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधकांना आणखी एक आयतं कोलीत हाती मिळालं. ते म्हणजे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं कृत्य. ऐन अधिवेशनात आमदार निवास येथे निकृष्ट दर्जाचं जेवण कॅन्टीनमधून दिलं म्हणून त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला बॉक्सिंग करत बेदम मारहाण केली. त्यामुळे आमदार संजय गायकवाड तसंच सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली.विशेष म्हणजे संजय गायकवाड हे सतत वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत.त्यांनी या प्रकरणावर खुलासा करताना ‘ आपली शिवसेना स्टाईल ‘ म्हटल्याने त्यावरूनही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
मूळ शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून किंवा सर्वात पुढं त्यांना साथ द्यायला आघाडीवर असणारे संजय शिरसाट यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ अधिवेशन काळात गाजला. पैशाची बॅग आणि सिगरेटचे झुरके घेत बनियान घातलेल्या मंत्री संजय शिरसाट यांचा बेडरूम मधला एक व्हिडिओ शिवेसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला. त्यावेळी ही नेमकी पैशाची बॅग कुणासाठी आणि कशासाठी घेतली होती? यावरून अनेक प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी संजय शिरसाटसह महायुती सरकारवर टीकेची तोफ डागली.
महायुतीचं सरकार अस्तित्वात आल्यापासून मंत्र्यांमध्ये वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठीआघाडीवर असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा पावसाळी अधिवेशनात ऑनलाईन रमी गेम खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आल्यामुळं पुन्हा त्यांच्यासह राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात रोषाला सामोरं जावं लागत आहे. लोकशाहीच्या पवित्र मंदिरातच मंत्र्यांकडून हे कृत्य लोकशाहीला घातक असल्याची टीका विरोधकांनी केली. त्यामुळं माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामाची मागणी विरोधकांकडून होत आहे. पण, माणिकराव कोकाटे राजीनामा देणार का? यावरून चर्चांना उधाण आले असले तरी त्यांच्या या वादग्रस्त कृतीमुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर मात्र नामुष्कीची वेळ ओढवली आहे. तर मंत्री, आमदार यांच्या वादग्रस्त विधाने व कृतीमुळे ‘आपले सरकार’च्या प्रतिमेला तडा बसत असल्याने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हेही नाराज आहेत. तर आधीच एका बाजूला पडलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही चिंताग्रस्त झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.#वादग्रस्तनेते #आपलंसरकारकीआपत्तीसरकार #महायुतीसरकार