maharashtra loksabha 2024 BJP NCP SHIVSENA

Maharashtra:’एम फॅक्टर’मुळे राज्यात महाविकास आघाडी जोमात, भाजप कोमात ! 

 घडतंय बिघडतंय… प्रवीण पगारे 
लोकसभा निवडणुकीसाठी  (Lok Sabha elections)महाराष्ट्रात (Maharashtra)  कोण बाजी मारणार या प्रश्नापेक्षा महायुती पर्यायाने भाजपला ( BJP) ‘४५ प्लस’चे लक्ष्य साध्य करता येईल का हा प्रश्न तूर्तास महत्वाचा ठरला आहे. आधी शिवसेना(Shiv Sena)  नंतर राष्ट्रवादी (  NCP)  या पक्षात विभाजनाचा डाव यशस्वी करणाऱ्या भाजपचे ‘ गणित’ निवडणूक होण्याआधीच फसले आहे. ज्यांना राज्याच्या सत्तेत सामावून घेतले, त्यांच्या ताकदीचा कितपत उपयोग होईल या चिंतेने भाजपला ग्रासले आहे तर महाविकास आघाडीने मुख्यत्वे शिवसेना ( उबाठा ) आणि राष्ट्रवादी ( शरद पवार ) या दोन पक्षांना सहानुभूतीचा फायदा होणार हे जवळपास स्पष्ट झाले असले तरी या दोन पक्षांनी काँग्रेसच्या मदतीने भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला गारद करण्यासाठी महत्वाच्या जागांवर ‘ एम’ कार्ड खेळले आहे. त्याचा फटका कोणत्या मतदारसंघात महायुतीला बसेल हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
  ‘एम फॅक्टर’ काय आहे. त्याचा कोणत्या मतदारसंघात कुणावर कसा परिणाम होईल आणि महायुतीला किती जागांवर पराभवाला सामोरे जावे लागेल. याचा आढावा सद्यस्थितीतील बदलत्या घडामोडी नुसार आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी फोडाफोडी करून मतविभाजनाचा डाव खेळणाऱ्या महायुतीचीच कोंडी महाविकास आघाडीने जागा वाटपाच्या खेळीतून केली. महाविकास आघाडीने जागा वाटपाची बोलणी संयमाने करताना ‘ मी मारल्या सारखे करतो…’ या धर्तीवर करून सत्ताधारी भाजप आणि मित्र पक्षांची दिशाभूल करण्यात यश मिळवले आहे.त्यामुळे तगडे उमेदवार द्यायचे कसे या पेचात भाजपला काही ‘आयारामां’ना संधी द्यावी लागली आहे. मात्र त्यावरून निष्ठावंतांची नाराजी मोठी पसरली आहे. ती कशी दूर करायची यासह ‘घरा’तूनच पाडापाडीचे राजकारण झाले तर हेच मोठे आव्हान भाजपपुढे आहे.  
राज्यात जातीपातींचे राजकारण महाराष्ट्रालाच (Maharashtra) काय देशाला नवे नाही. निवडणूक कोणतीही असू द्या, जातीपातींवर मतांचे समीकरण अनुकूल कसे करून घेता येईल याकडेच प्रत्येक राजकीय पक्ष असो अथवा राजकीय व्यक्ती कायम लक्ष केंद्रीत करत आलेला आहे. फरक इतकाच २०१४ नंतर जातीपातींचे कार्ड निवडणुकांमध्ये खेळणे बंद झाले किंबहुना भाजपने जातीपातींवर आधारीत अडचणीत आणणारी पद्धत बंद करण्याची रणनीती यशस्वी केली. ‘शिवशक्ती – भीमशक्ती’ हा प्रयोग भाजपनेच हाणून पाडला म्हणजे त्याचे महत्व कमी केले. आरपीआयला स्वतःकडे खेचताना पक्षातील ओबीसी नेतृत्वही संपवले. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपमध्ये त्यांच्यासारखा ओबीसी नेता आज नाही . पण ओबीसीमधील अनेकांना संधी पक्षाने दिली आहे. दहा वर्षात त्याचे प्रमाण मोठे आहे.हे केवळ उदाहरण दाखल आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्यात जातीपातींच्या आधारे मतांच्या समीकरणाला फाटा देण्यात भाजप यशस्वी ठरली. मात्र आता मराठा आरक्षण प्रश्नामुळे भाजपची मोठी कोंडी झाली आहे. नेमक्या याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने राज्यातील महत्वाच्या जागांवर ‘ एम फॅक्टर ‘ची मात्रा वापरली आहे.https://www.flipkart.com/48-laws-power-satta-shaktiche-niyam-marathi/p/itmf88b14013e9bb?pid=RBKGGQEWYXJEVGHT&lid=LSTRBKGGQEWYXJEVGHT50DEMR&marketplace=FLIPKART&q=48+laws+of+power&store=bks&srno=s_1_37&otracker=AS_QueryStore_OrganicAutoSuggest_1_3_na_na_na&otracker1=AS_QueryStore_OrganicAutoSuggest_1_3_na_na_na&fm=organic&iid=7c5aecac-cf9a-435b-9075-27000b9c24fb.RBKGGQEWYXJEVGHT.SEARCH&ppt=hp&ppn=homepage&ssid=m0ao5mjqow0000001713627810844&qH=245352be645b0d8c
‘एम’ म्हणजे केवळ मराठाच नाही तर माळी, मुस्लिम, मातंग, महार आदी अनेक जातींच्या मतांची मोट बांधून महायुतीला धोबी पछाड देण्यास महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. राज्यात या समाजांच्या मतांची आकडेवारी पाहिल्यास आणि भाजपपासून दुरावणाऱ्या ओबीसी मतांचे समीकरण महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे पक्षांची फोडाफोडी करून मत विभाजनाचा डाव मांडणाऱ्या भाजप पर्यायाने महायुतीवर महाविकास आघाडीने ‘एम फॅक्टर’द्वारे मात केली आहे.ती कशी तर एक उदाहरण म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ. वंजारी समाजाच्या प्रीतम मुंडे या खासदार मात्र आता पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याआधी स्व. गोपीनाथ मुंडे हे सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येत. मात्र आता तसे चित्र नाही. मताधिक्य घटत आहे. याचीच चिंता मुंडे भगिनींना आहे ;पण आजवर त्यांनी जे मताधिक्य मिळवले,त्यात वंजारी समाजाचा वाटा किती ? आणि अन्य म्हणजे ओबीसी, मराठा, मातंग, मुस्लिम ,महार आदी वर्गांचा हातभार किती ? हे प्रश्न दुर्लक्ष करून चालणार नाही.बीड लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभानिहाय  ताकद पाहिल्यास राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे . मात्र धनंजय मुंडे हे अजित पवार गटात असल्याने त्याचा फटका महायुतीलाच अधिक बसणार आहे.त्यामुळे यंदा महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या रिंगणात असलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांचे कडवे आव्हान महायुतीला आहे. याच पार्श्वभूमीचे राज्यातील अन्य महत्वाचे मतदारसंघ महाविकास आघाडीने ‘लक्ष्य’ केले आहे. Maharashtra: Due to ‘M Factor’, Maha Vikas Aghadi is in full swing in the state, BJP is down! 

(जातीपातींचा उल्लेख केवळ बातमीसाठी आहे. वास्तवात purepoliticsची  विचारधारा ही जातीपातींविरहित समाज व्यवस्था असावी आणि त्यानुसार राजकीय क्षेत्र असावे हे अभिप्रेत आहे. )

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!