Maharashtra Lok Sabha Election 2024 BJP

Lok Sabha Election 2024:  महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विशेष, मतदार कुणाला ‘टार्गेट’ करणार!

नवी दिल्ली। अखेर लोकसभा निवडणुकीचे(Lok Sabha elections ) बिगुल वाजले.देशात सात टप्प्यात मतदान होणार असून मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. महाराष्ट्रात( Maharashtra )  पाच टप्प्यात निवडणुका होणार असून राज्यासाठी ही लोकसभा निवडणूक (Lok Sabha elections )  विशेष असणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात बंड झाल्यानंतरची ही पहिलीच सर्वात मोठी निवडणूक असणार आहे. त्यामुळे  कोणता पक्ष किती जागा जिंकतो हे पाहणे महत्त्वाचे  ठरणार असून ४५ जागांचे लक्ष्य भाजप साध्य करतो की, मतदारराजा  भाजपसह एकनाथ शिंदे – अजित पवार गटाला मतांतून ‘टार्गेट ‘ करतो हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे.  

१९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे रोजी महाराष्ट्रात  ( Maharashtra )    पाच टप्प्यात मतदान  होणार आहे. पहिला टप्पा १९ एप्रिल २०२४ रोजी पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघांत मतदान होणार आहे. तर २६ एप्रिल २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यात ८ मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार असून, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे. तिसरा टप्पा ७ मे रोजी होणार असून, यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. चौथा टप्पा १३ मे रोजी पार पडणार असून, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांचा समावेश आहे. शेवटचा पाचवा टप्पा २० मे रोजी होणार असून, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण १३ मतदारसंघांत मतदान होणार आहे.

राज्यात सत्तेची मोट बांधण्यासाठी भाजपने आधी शिवसेना नंतर राष्ट्रवादी पक्षात   बंडाचे निशाण फडकवण्यास भाग पाडताना ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांना हाताशी धरून एकनाथ शिंदे व अजित पवार यांना गळाला लावले. शिवसेना – राष्ट्रवादी पक्षाचे विभाजन करून लोकसभा निवडणुकीचे लक्ष्य गाठण्याची रणनीती त्यामागे असली तरी महाराष्ट्रातील जनतेला हा सत्तेचा विचित्र प्रयोग पचनी पडलेला नाही. त्यावरून भाजपच काय विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गट यांच्यावर जनमानसातून टीकेची झोड उठत आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील लोकसभेच्या  ४८  जागांपैकी ४५ जागांचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे व अजित पवार यांना हाताशी धरून भाजप टार्गेट गाठतो की, जनतेकडून ‘टार्गेट’ ठरतो यादृष्टीने यंदाची लोकसभा निवडणूक महत्वाची ठरणार आहे. त्यातही मराठा आरक्षण आंदोलन प्रश्नावरून भाजपवर मोठा रोष आहे आणि भाजपसमवेत गेलेल्या शिंदे – पवार गटावर रागही आहे. त्यामुळे मतपेटीतून हा रोष दिसेल का ? या प्रश्नासह भाजप ४५ जागांचे लक्ष्य साध्य करेल का हा मुद्दा राजकीय वर्तुळात महत्वाचा ठरला असला तरी या दोन्ही गटांच्या मतविभाजनाचा नेमका महाविकास आघाडीला फायदा होईल का याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Lok Sabha Election 2024:This year’s election in Maharashtra is special, who will the voters ‘target’!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *