Sharad Pawar Mahavikas Aghadi, India Front 'Modi Ki Guarantee' ridiculed

Sharad Pawar’s appeal:मोदी- भाजपविरोधात आता जनतेत जनजागृती करा 

पुणे | राज्यकर्ते सामांन्यांचे हिताचे रक्षण करणारे आहेत, असे मला वाटत नाही. आम्ही शेतकऱ्यांचे सत्तर हजार कोटीचे‌ कर्ज माफ केले, आणि मोदी‌ ((Modi-BJP)) सरकार शेतकऱ्यांकडे ढुंकून पाहायला देखील तयार नाहीत. विरोधी विचारावर घाव घालण्याचे‌ काम मोदी सरकारकडून सुरू आहे. हे बदलण्यासाठी आणि भाजपला (BJP)  पराभूत करण्यासाठी आपण सर्व समविचारी पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेमध्ये जाऊन त्यांना भविष्यातील संकटाची माहिती देत जनजागृती करणे (Create public awareness against Modi-BJP now)आवश्यक असल्याचे आवाहन  ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी (Sharad Pawar’s appeal)    कार्यकर्त्यांना केले.
 

पंतप्रधान मोदी  यांना सत्तेतून पायउतार करणे आणि   समविचारी पक्षांची सत्ता देशावर आणण्यासाठी महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट स्थापन (Mahavikas Aghadi, India Front)करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या  कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा शनिवारी काँग्रेस भवन येथे    पार पडला. यावेळी  पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे  , डॉ. अमोल कोल्हे, नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य चंद्रकांत हांडोरे, शिवसेना संपर्कनेते सचिन अहिर , माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार संजय जगताप, रवींद्र धंगेकर, वंदना चव्हाण यांच्यासह इंडीया फ्रंटच्या विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले कि,गेल्या साठ-सत्तर वर्षात आपण अनेक राज्यकर्ते पाहिले. भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांचेही सरकार पाहिले. मात्र गेल्या आठ ते दहा वर्षात मोदी यांची भूमिका देशाला दिशा देण्याचे काम करणाऱ्यांविषयी देशातील जनतेच्या मनात घृणा निर्माण करण्याचे काम करणारी अशीच  आहे. मोदी‌ हे सतत जवाहरलाल नेहरू व त्यांच्या कुटुंबावर हल्ले करत त्यांना बदनाम करण्याचे काम करत आहेत. नेहरूंनी देश प्रगतीच्या मार्गावर नेला, हे संपूर्ण जग मान्य करत आहे, मात्र मोदी ते मान्य करत नाहीत.असेही ते म्हणाले.

‘मोदी की गॅरंटी’ची उडवली खिल्ली 

 केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करत विरोध करणाऱ्यांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात ठेवायचे, त्यांच्यावर दबाव टाकायचा अशी अनेक उदाहरणे सद्यस्थितीत  सत्तेत असलेल्या मोदी सरकारने सर्वांसमोर ठेवली आहेत.त्यामुळे  मोदींचा  पराभव करण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन आपली मूठ घट्ट करण्याची गरज आहे. आज ‘मोदी की गॅरंटी’  (‘Modi Ki Guarantee’ ridiculed) असा प्रचार केला जात आहे. ही अशी गॅरंटी आहे की ‘ज्यावर तारीखच नाही आणि त्याचा धनादेश वटतही नाही’, अशा शब्दात   पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडविली. 
Sharad Pawar’s appeal: Create public awareness against Modi-BJP now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *