Shiv Sena Uddhav Thackeray group Money in BJP's coffers through corruption

Shiv Sena Uddhav Thackeray group: भ्रष्टाचारातूनच  भाजपच्या तिजोरीत पैसे! 

मुंबई। इंडिया आघाडीची (India Alliance) बैठक उद्या होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने (Shiv Sena Uddhav Thackeray group)  दैनिक सामना या आपल्या मुखपत्रातून भाजपवर (BJP) टीकेची तोफ डागली आहे. 2024 असो की 2023, निवडणुका कधीही घ्या. भाजपने आता ‘चांद्रयान 3’ (‘Chandrayaan 3’)आणून त्यावर स्वार होऊन प्रचार (campaigns ) केला तरी त्यांचा पराभव अटळ आहे, असा ठाम  दावा   ठाकरे गटाने(Thackeray group  criticized) केला आहे.शिवाय   भ्रष्टाचारातून(corruption)  भाजपच्या तिजोरीत पैसे आल्याचे म्हटले आहे. 

मुंबईत इंडिया आघाडीची  (India Alliance)  बैठक उद्यापासून सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर वातावरण  निर्मितीला सुरूवात झाली आहे.   ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातील संपादकीयमध्ये  म्हटले आहे की, 2024 असो की 2023, निवडणुका कधीही घ्या, हुकूमशाहीरूपी हिरण्यकश्यपूचा अंत हा ठरलेला आहे. ‘इंडिया’ आघाडीने देशाचे वातावरण ढवळून काढले आहे. जनता जागी झाली आहे व कोणत्याही भूलथापांना ती बळी पडणार नाही.
  देशभरातील हेलिकॉप्टर्स बुक
ठाकरे गटाने म्हटले आहे की, मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार हे आता ब्रह्मदेव तरी सांगू शकेल काय? हा प्रश्नच आहे. हरण्याच्या भीतीने निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असा नवा ‘अ-लोकतांत्रिक’ पायंडा भाजप व त्यांच्या फुटीर महामंडळींनी पाडलेला दिसतो. पण लोकसभा निवडणुका मात्र वेळेच्या आधीच, म्हणजे डिसेंबर महिन्यातच घेतल्या जातील, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी यांनी केला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत देशभरातील सर्व हेलिकॉप्टर्स बुक करण्यास सुरुवात झाली आहे.  

 
  भाजपने ईव्हीएमही बुक करून ठेवलीत
ठाकरे गटाने आरोप केला आहे की, सर्व हेलिकॉप्टर्सबरोबर लाखो ‘ईव्हीएम’ही भाजपने बुक करून ठेवलीत. त्याबाबतही त्यांचा वेगळा खर्च आणि हिशेब असणारच. अर्थात तुम्ही कितीही काहीही बुक केले तरी यावेळी मतदार भ्रष्ट ईव्हीएमच्या छाताडावर पाय ठेवून हुकूमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत. विद्यमान लोकसभेची मुदत 2024 मध्ये संपत असताना मोदी-शहा 2023 सालात निवडणुका का घेतील? याचे उत्तर सोपे आहे. सरकारच्या ज्योतिषांनी म्हणे तसा सल्ला दिला आहे. आता हे ज्योतिषी आहेत की तांत्रिक-मांत्रिक हे त्यांनाच माहीत. ‘इंडिया’ आघाडीने 2024 साली देशात सत्तापरिवर्तन करण्याचा विडाच उचलला आहे. निवडणुका 2024 ला करा नाहीतर 2023 अखेरीस करा, मोदी-शहांच्या कुंडलीत राजयोग नाही व चोऱ्यामाऱ्या करून असे काही करण्याचा प्रयोग केलाच तर ते सर्व प्रकरण त्यांच्यावरच उलटेल.
 
सत्ता योग संपला
ठाकरे गटाने म्हटले आहे की, भाजपने देशातील सर्व विमाने, हेलिकॉप्टर्स प्रचारासाठी बुक केली आहेत. आम्ही म्हणतो, त्यांना हवे ते करू द्या. त्यांनी ‘चांद्रयान 3’ आणून त्यावर स्वार होऊन प्रचार केला तरी त्यांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे. त्यांच्या कुंडलीतल्या ओढूनताणून आणलेल्या सत्ता योगाची हवा गेली आहे. त्यांना राजयोग नव्हताच. ओढून–चोरून आणलेला सत्ता योग होता. तो आता संपल्यात जमा आहे.
भ्रष्टाचारातून भाजपच्या तिजोरीत पैसे
ठाकरे गटाने म्हटले आहे की, खासगी, छोटी विमाने, हेलिकॉप्टर्स यांचे बुकिंग करून आपल्या राजकीय विरोधकांना कोंडीत पकडायचे. निवडणूक प्रचारासाठी कोणतीच वेगवान साधने विरोधकांना मिळू नयेत यासाठी सुरू असलेला सत्तेचा हा गैरप्रकार निषेधार्ह आहे. भाजपकडे व त्यांच्या पाठीराख्यांकडे अमर्याद साधनसंपत्ती आहे. ही संपत्ती कशा पद्धतीने येते याचे एक साधे उदाहरण आम्ही देतो. ‘चांद्रयान 3’ मोहिमेचा एकूण खर्च किती झाला? तर 650 कोटी रुपये आणि दिल्लीतील द्वारका एक्सप्रेस वेच्या 3 किलोमीटर रस्त्याचा खर्च 750 कोटींवर गेल्याचे उघड झाले. जे काम फार तर 75 कोटींत व्हायला हवे ते 750 कोटींवर गेले. मग मधल्या पाचशे कोटींचा हिशेब कोठे गेला? ते भाजपच्या तिजोरीत गेले की भाजप पुरस्कृत ठेकेदाराच्या खिशात? त्या 3 किलोमीटरमागे 500 कोटींची फावडेबाजी करणाऱ्यांनी निवडणूक प्रचारासाठी देशातील सर्व खासगी विमाने, हेलिकॉप्टर्स बुक करून ठेवली तर त्यात नवल ते कसले?भाजपने लोकशाहीला वधस्तंभावर लटकवले
भाजपवर घणाघाती टीका करताना ठाकरे गटाने म्हटले आहे की, 2014 सालापासून मोदी सरकारची पावले हुकूमशाहीकडे वळू लागली होती. 2019 मध्ये त्यांनी लोकशाहीला जवळजवळ वधस्तंभावर लटकवले व आता 2024 मध्ये वधस्तंभाचा खटका ते ओढतील ही भीती आहे. पण या देशाची चिंता भारतमातेस आहे. भारतमाता म्हणजे मोदी-शहा-अदानी नसून 140 कोटी जनता. ही जनता 2024 मध्ये हुकूमशाही प्रवृत्तीचा पराभव करून वधस्तंभावरील लोकशाहीची प्राणप्रतिष्ठा करील. त्यासाठीच ‘इंडिया’ आघाडीने जन्म घेतला आहे.

हुकूमशाहीरूपी हिरण्यकश्यपूचा अंत ठरलेला
ठाकरे गटाने म्हटले आहे की, भगवान विष्णूने आपला भक्त प्रल्हादास दैत्य हिरण्यकश्यपूपासून वाचवण्यासाठी नरसिंह अवतार घेतला. दैत्य हिरण्यकश्यपूचा अंत नरसिंहाने ज्या भयंकर पद्धतीने केला तीच गत जगभरातील सर्वच हुकूमशहांची झाली. एक तर हुकूमशहांना देश सोडून पळून जावे लागले किंवा खवळलेल्या जनतेने त्यांच्या प्रासादात घुसून त्यांचा खात्मा केला. कारण लोकशाहीत जनता हीच नरसिंहाचा अवतार आहे. त्यामुळे 2024 असो की 2023, निवडणुका कधीही घ्या, हुकूमशाहीरूपी हिरण्यकश्यपूचा अंत हा ठरलेला आहे. (Shiv Sena Uddhav Thackeray group: Money in BJP’s coffers through corruption!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *