मुंबई। समुद्रातला तळ मोजला जाईल, पण शरद पवारांच्या (Sharad Pawar)डोक्यात काय चालू आहे, ते मोजणं शक्य नाही. असे होऊ शकते की भाजपाने ( BJP ) पावलं टाकत राष्ट्रवादीचाच (NCP )गेम केला असेल. पण उलटंही होऊ शकते . शरद पवारही भाजपाचा गेम करतील की काय अशा संभ्रमात ही अवस्था आहे , असे सूचक विधान ‘प्रहार’चे आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी केले आहे.
शरद पवारांच्या बीड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सध्याच्या राजकीय संभ्रमावस्थेवर भाष्य केले.कडू यांनी शरद पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले आहे. शरद पवारही भाजपाचा गेम करतील की काय अशा संभ्रमात ही अवस्था असल्याचे त्यांचा ठाम दावा आहे. शिवाय ते भाजपचा गेम करू शकतील असेही त्यांनी म्हटले आहे. ( MLA Bachu Kadu: Sharad Pawar will also play BJP’s game!)
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा… ‘सर्व ठरवून’ या सदरात
सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये भाजपच्या साथीने गेलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ‘सर्व ठरवून’ या सदरात ‘टीआरपी’ चा खेळ सुरु आहे का असा संभ्रम जनतेमध्ये सुरु आहे.
ईडी, सीबीआयचा ससेमिरा टाळताना गमावलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळविण्यासाठी राष्ट्रवादीत सोईस्कर दोन गट पाडले गेले आहेत की काय यावरही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात घडत आहे आणि ‘आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी’ या भाष्यालाही जनतेमधून हरकत घेतली जात असून महाराष्ट्राच्या विकासाचा पुळका आताच कसा असा सवालही केला जात आहे. दुसरीकडे आमच्या कुटुंबात दुरावा नाही. या उत्तरावरूनही राष्ट्रवादीत हे सर्व ठरवून सुरु असल्याचेच स्पष्ट होत असल्याचा दावा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.