Rahul Gandhi Membership Restoration

Rahul Gandhi Lok Sabha Membership:आता  लोकसभेत नरेंद्र मोदी-राहुल गांधी ‘आमने-सामने’!

नवी दिल्ली । काँग्रेसने (Congress )   मणिपूर हिंसाचारावरून मोदी सरकारविरोधात (  Modi government ) अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे. हा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारला असून, त्यावर चर्चा होणार आहे. प्रस्तावावरील चर्चेआधीच काँग्रेस नेते राहुल गांधींना खासदारकी बहाल (Rahul Gandhi Membership Restoration)करण्यात आली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर लोकसभेत ते बोलू शकणार आहेत. मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi  )  यांनाही या प्रस्तावाला उत्तर द्यावे  लागणार आहे. परिणामी  यानिमित्ताने लोकसभेत नरेंद्र मोदी-राहुल गांधी ‘आमने-सामने’ (Narendra Modi-Rahul Gandhi will be seen ‘face-to-face’ in the Lok Sabha)दिसण्याची दाट शक्यता आहे.त्यात १३६ दिवसांनी राहुल गांधी संसदेत परत येणार असल्याने सत्ताधारी भाजप (bjp)आता कोणती भूमिका घेते याहीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता पवित्रा घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा खासदार झाले आहेत. राहुल गांधींना संसद सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना लोकसभा सचिवालयाने जारी केली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी लोकसभेचे दरवाजे खुले झाले आहेत.
मोदी आडनाव बदनामी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राहुल गांधी यांना ठोठावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे त्यांचा संसदेत परतण्याचा मार्ग मोकळा झाला होता. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघाचे खासदार आहेत.

राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे एका निवडणूक सभेत मोदी आडनावबद्दल विधान केले होते. ते म्हणाले होते की, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी ही आडनाव एकसारखीच कशी? सर्व चोरांची आडनाव मोदी का आहे? त्यामुळे मोदी आडनाव बदनामी प्रकरणात 23 मार्च रोजी राहुल गांधींना सूरत येथील कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला राहुल गांधींनी आधी उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. 134 दिवसांनी सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली.
संसदेचे  पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांनी मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला आहे. अशा वेळी राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळणार असल्याने विरोधकांचा आत्मविश्वास दुणावला आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *