मुंबई। राष्ट्रवादीतील एक गट फुटून एकनाथ शिंदे -देवेन्द्र फडणवीस सरकारमध्ये ( Eknath Shinde-Devendra Fadnavis government) सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतील एका गटाच्या नऊ जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. परिणामी शिंदे गटातील आमदारांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी झाली आहे. त्यात आता आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu)यांनी केलेल्या विधानामुळे मंत्रिमंडळ विस्तार (expanding the cabinet) होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांची अवस्था आणखी बिकट झाली आहे.
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर(expanding the cabinet) भाष्य केले आहे. आमदार कडू यांनी म्हटले आहे कि, मंत्रिमंडळ विस्तारादिवशी मी अमेरिकेत किंवा परदेशात असेल, असे मागे सांगितले आहे. आता जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू शकते. नंतर लोकसभा आणि मग विधानसभेची आचारसंहिता लागते. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तार करून काहीच फायदा होणार नाही.असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे विधी विधी मंडळ अधिवेशनानंतर मंत्री मंडळ विस्तार होईल याकडे लक्ष ठेवून असलेल्या शिंदे गटातील आमदारांच्या मनसुब्यावर पाणी फिरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी फिल्डिंग लावून बसलेले आमदार पुन्हा टाहो फोडणार अशी शक्यता असली तरी त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेन्द्र फडणवीस कशी पळवाट शोधतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
News Title | MLA Bachu Kadu | expanding the cabinet |There is no benefit in expanding the cabinet | Eknath Shinde-Devendra Fadnavis government