मुंबई ।शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Thackeray group of Shiv Sena)आपल्या सामना या मुखपत्राद्वारे (mouthpiece Saamna) पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप व शिंदे गटावर ( BJP and the Shinde group) जोरदार हल्ला चढवला आहे. सद्यस्थितीत काही जण मिशी व दाढीवर बोटे फिरवून उसने अवसान आणत आहेत;पण आत्याबाईंच्या मिश्यांप्रमाणे त्यांची अवस्था आहे. झुरळांनाही मिश्या असतात व अनेकदा फवारणी करून ढेकूण व झुरळे मारावी लागतात,अशा शब्दात टीका केली आहे. (Criticism of Shiv Sena’s Thackeray group)शिवाय शिवरायांच्या महाराष्ट्रात आगी लावण्याचे कंत्राट कोणी घेतले असेल तर जनतेने सावध राहायला हवे. फडणवीसांना गुरुजी असतील, पण महाराष्ट्राची अकरा कोटी जनता हेडमास्तर आहे, असेही ठाकरे गटाने (Thackeray group of Shiv Sena) आपल्या मुखपत्राद्वारे म्हटले आहे.
मणिपूर, हरियाणाच्या वाटेने महाराष्ट्र ( Maharashtra) जाणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) हे असे गुरुजी लाभल्यानेच महाराष्ट्र शिवरायांच्या, फुले, आंबेडकर, शाहूंच्या मार्गापासून भरकटताना दिसत आहे. पण, महाराष्ट्र हे शहाण्यांचे व शूरांचे राज्य आहे. शाहिस्तेखानाची बोटे छाटणारा महाराष्ट्र झुरळांच्या मिश्यांची पर्वा कशाला करेल?, असेही ठाकरे गटाने संभाजी भिडे यांचा नामोल्लेख टाळत म्हटले आहे.(Criticism of Shiv Sena’s Thackeray group)
हिंसेचा आगडोंब … निवडणुकांची पूर्वतयारी
मणिपुरात हिंसेचा आगडोंब पेटला असतानाच भारतीय जनता पक्षाच्या उपवस्त्रांनी आता हरयाणातही हिंसा भडकवून अनेकांचे बळी घेतले, मालमत्तेचे नुकसान केले. दहशतीचे वातावरण निर्माण केले. हरियाणाची आग राजधानी दिल्ली आणि राजस्थानातही पेटू शकते. तशी तयारी झाल्याची माहिती आहे.हरियाणा व राजस्थानात लवकरच विधानसभा निवडणुका होतील. त्याची ही पूर्वतयारी दिसते.याकडेही लक्ष वेधले आहे. इकडे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या गुरुजींनी महात्मा फुले, संत साईबाबा, गांधी, नेहरू यांच्यावर घाणेरड्या भाषेत चिखलफेक करून माहौल बिघडवला आहे, असा आरोप ठाकरे गटाने संभाजी भिडे यांच्यावर केला आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी हे असे जातीय व धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण करायचे व जागोजागी ढोंगी हिंदुत्वाच्या घंटा वाजवून प्रचारात उतरायचे असे एकंदरीत कारस्थान दिसते. त्या पूर्वतयारीसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, फडणवीसांची गुरुजी ब्रिगेड अशा फौजांना आधीच मैदानात उतरवले गेले आहे.
भाजप कोणत्याही थराला जाईल
निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल. हे लोक हिंदू-पाकिस्तान दंगली घडवतील, मंदिरांवर हल्ले घडवून आणतील, जवानांच्या हत्या करतील, पाकिस्तानबरोबर लुटुपुटुचे युद्ध करतील. ते काहीही करतील. जे पुलवामा करू शकतात ते काहीही करतील, असा इशारा जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी दिला आहे व जसजशा निवडणुका येत आहेत तसे हे सर्व तंतोतंत घडताना दिसत आहे. देशाची सूत्रे अशा लोकांच्या हाती गेली आहेत, ज्यांच्या लेखी जनतेच्या जिवाचे मोल शून्य आहे. दंगली, कत्तली, विरोधकांना अडकवणे हाच त्यांचा राजकीय खेळ बनला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आता सांगत आहेत, हरयाणाची स्थिती ‘मिनी पाकिस्तान’प्रमाणे झाली आहे. भाजप केंद्रात 9 वर्षे व हरयाणात 10 वर्षे सत्तेत आहे. मग त्यांनी हरयाणाचे ‘मिनी पाकिस्तान’ कसे काय होऊ दिले? हा प्रश्नच आहे, असेही ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रात म्हटले आहे.
छगन भुजबळांवर निशाणा
महाराष्ट्रात फडणवीसांच्या गुरुजींनी महात्मा फुल्यांवर घाणेरडे विधान केले, तरीही फुल्यांचे वैचारिक वारसदार छगनराव भुजबळ हे फडणवीसांच्या मांडीस मांडी लावून सरकारात बसले आहेत. सत्तेसाठी विचारांना तिलांजली असेच एकंदरीत हे धोरण आहे, असे टीकास्र ठाकरे गटाने छगन भुजबळ यांच्यावर सोडले आहे.Criticism of Shiv Sena’s Thackeray group: Fadnavis will have Guruji, but Maharashtra’s eleven crore Janata Headmaster!