Prakash Ambedkar:शरद पवारांवर टीका ,पक्षफुटीचा स्टंट करून  जनतेला फसवू नका!

मुंबई। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी  एक मीम शेअर करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर (NCP President Sharad Pawar)टीका केली आहे.आंबेडकर हे  ट्वीटमध्ये (Tweet)म्हणतात, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे वेगवेगळ्या भिंगातून पाहता, तेव्हा तुमच्या लक्षात येते  की ‘गोरमेंट आंटी’ अगदी बरोबर बोलली होती. तुम्हाला (शरद पवार Sharad Pawar) जर द्वेष, जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापाऱ्याबरोबर (भाजपा) जायचे  असेल, तर खुशाल जावा. पण तुम्ही पक्षफुटीचा स्टंट करून महाराष्ट्र आणि भारतातील जनतेला फसवू नका. शरद पवार हे नेहमीच दुतोंडी वागले आहेत.(Criticism on Sharad Pawar) ते लग्न एकाशी करतात आणि संसार दुसऱ्याबरोबर थाटतात.अशा शब्दात प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी  टीका केली आहे.

https://twitter.com/Prksh_Ambedkar/status/1686604637066190849 

 अजित पवारांसह चाळीस आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. पक्षफुटीनंतर चार-पाच दिवस अजित पवार गट आणि शरद पवार गटाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. पण त्यानंतर दोन्ही गटातील नेतेमंडळी मात्र शांत झाल्याचे पाहायला दिसून येत आहे. पावसाळी अधिवेशनात देखील दोन्ही गटाचे नेतेमंडळी एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकांबद्दल राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांसह जनतेमध्ये देखील संभ्रम आहे.याच पार्श्वभूमीवर त्यातच काल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिले. 

या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची देखील उपस्थिती होती. या कार्यक्रमात  शरद पवारांनी उपस्थिती लावल्याने मविआ नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या राजकीय घडामोडींनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर टीका केली. 

  ट्वीटमध्ये (Tweet)प्रकाश आंबेडकरांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या महिलेचा मीम शेअर केला आहे. संबंधित मीममधील महिलेने  काही दिवसांपूर्वी सरकारविषयी अपशब्द उच्चारत टीका केली होती. सर्वजण मिळून आम्हाला पागल बनवत आहेत, अशी टीका त्या महिलेने  केली होती. त्यानंतर या महिलेची सोशल मीडियावर ‘गोरमेंट आंटी’ अशी ओळख निर्माण झाली.(Prakash Ambedkar: Criticism on Sharad Pawar, don’t deceive the people by doing a stunt of party split!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *