Sharad Pawar: छत्रपती शिवराय  हेच सर्जिकल स्ट्राईकचे जनक!

पुणे ।अलिकडच्या काळात या देशातील  जवानांनी  देशाचे  रक्षण करण्यासाठी  सर्जिकल स्ट्राईक (surgical strike) केला होता. त्याची चर्चा होते आहे. मात्र लाल महालात शाहिस्तेखान जेव्हा आला होता आणि तो तळ ठोकून बसला होता, तेव्हा या देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवरायांनी (Chhatrapati Shivarai)  केला. आपल्याला ही गोष्ट कधीच विसरता येणार नाही. अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. असा दाखला राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार ( Sharad Pawar)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर (Prime Minister Narendra Modi ) दिला. शिवाय माध्यमांची आवश्यकता काय आणि कशासाठी यावरही त्यांनी ऐतिहासिक घटनांचा उल्लेख केला. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak National Award)देऊन गौरवण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे  म्हणून शरद पवार यांची उपस्थिती होती. आपल्या भाषणात शरद पवार यांनी पुण्याचे  ऐतिहासिक महत्त्व काय आहे ते सांगितले. तसेच  इतिहासातला एक प्रसंग सांगत छत्रपती शिवाजी महाराज हे सर्जिकल स्ट्राईकचे जनक कसे होते? त्याचाही दाखला दिला. 
आजचा दिवस हा लोकमान्यांच्या १०३ व्या पुण्यतिथीचा आहे. त्याचा सोहळा या ऐतिहासिक पुणे शहरात होतो आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की देशात पुण्याचं एक वेगळं महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्या जगाला माहित आहे. याच पुणे जिल्ह्यातल्या शिवनेरीवर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आपल्या देशात अनेक राजे महाराजे होऊन गेले. मोगलांचे संस्थान असेल किंवा यादवाचं संस्थान असेल पण शिवछत्रपतींचं राज्य हे हिंदवी स्वराज्य होतं ते रयतेचं राज्य होतं. ते रयतेचं राज्य निर्माण करण्याचं काम पुण्यात झालं हा पुण्याच्या गौरवाचा एक भाग आहे.
  पवार म्हणाले, इंदिरा गांधी, मनमोहन सिंह, बाळासाहेब देवरस, अटल बिहारी वाजपेयी यांसह अनेक दिग्गजांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले  आहे.  त्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही नाव आले  याचा विशेष आनंद होतो आहे, असेही   पवार यांनी भाषणात नमूद केले.
पत्रकारिता हे शस्त्र … 
ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून बाहेर पडायचे  असेल तर सामान्य माणसाला जागृत केले  पाहिजे हे लोकमान्यांना माहित होते. त्यासाठी एका जबरदस्त शस्त्राची आवश्यकता आहे हे त्यांना कळले. त्यामुळे त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रं सुरु केली. केसरीचा अर्थ सिंह असा होता. लोकमान्य टिळकांनी पत्रकारिता करत परकिय आक्रमणांवर प्रहार केले. ते कायम म्हणत होते की पत्रकारितेवर कुणाचाही दबाव असता कामा नये. ही भूमिका त्यांनी कायमच पाळली.
 १८८५ मध्ये पुण्यात काँग्रेसचा जन्म झाला. त्या काळात पहिले  अधिवेशन इथेच होणार होते. पण प्लेगची साथ आली.  त्यामुळे मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानावर ते  झाले. त्यावेळी मवाळ आणि जहाल असे दोन प्रकारचे नेते होते. जहालांचे  प्रतिनिधीत्व लोकमान्य टिळक यांनी केले. स्वराज्य हा माझा हक्क आहे आणि तो घेतल्याशिवाय मी राहाणार नाही हा नारा दिला. स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही त्रिसूत्री आणि त्या माध्यमातून स्वातंत्र्याचे  आंदोलन त्यांनी केले  असेही शरद पवार यांनी यावेळी म्हणाले.Sharad Pawar: Chhatrapati Shivarai is the father of surgical strike!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *