मुंबई। चिन्हापेक्षा विचार महत्वाचे आहेत. शरद पवारांबरोबर (Sharad Pawar) राहून लढतोय हे आमच्यासाठी महत्वाचे आहे,असे भाष्य आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी केले आहे.मात्र निवडणूक आयोग (Election Commission) कोणाच्या बाजुने निर्णय देईल, याचा अंदाज सर्वांना आहे. आम्ही न्यायालयात जात लढाई लढू. पण, येत्या काळात लढत असताना चिन्ह राहिले नाही, तरी लोकांनाच विचारावे शरद पवार यांना कोणते चिन्ह मिळाले पाहिजे. ते चिन्ह मिळाल्यानंतर लोकांना विश्वासात घेऊन येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार, याचा अंदाज आला आहे,असेही (Rohit Pawar)त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांसह (Ajit Pawar) काही आमदारांनी शिंदे-फडणवीस ( Shinde-Fadnavis government) सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( NCP)उभी फूट पडली आहे. यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची हा मुद्दा उपस्थित झाला आहे. यावरून निवडणूक आयोगाने (Election Commission)बुधवारी ( २६ जुलै ) शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला नोटीस बजावली आहे. अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रोहित पवार म्हणाले, गेल्या काही वर्षात निवडणूक आयोग सत्तेतील लोकांची बाजू घेतो, असे मत सामान्य लोकांचे झाले आहे. निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असून ती एक प्रक्रिया आहे. ती पूर्ण करत असताना दोन्ही बाजुचे गट ताकद लावतील आणि युक्तीवादही होईल. त्यामुळे चिन्हापेक्षा विचार महत्वाचे आहेत. शरद पवारांबरोबर राहून लढतोय हे आमच्यासाठी महत्वाचे आहे, असेही रोहित पवार यांनी सांगितलं.