पुणे। पुणे शहर काँग्रेसतर्फे (Pune City Congress) वारकऱ्यांवर (Ashadhi Wari 2023) झालेल्या लाठीचार्जचा(Warkari Lathicharge) निषेध करण्यासाठी सन्मान दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते ‘आम्ही वारकऱ्यांच्या सन्मान करतो’,’आमची संस्कृती वारकरी संप्रदाय’,’महाराष्ट्राचा अभिमान’ असे फलक घेऊन वारकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारकऱ्यांवर अमानुष पद्धतीने झालेला लाठी चार्ज कोणाच्या इशाऱ्याने केला होता ? भागवत संप्रदायाच्या 350 वर्षाच्या इतिहासात अशी कुठलीही घटना घडली नव्हती. कित्येक वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव आणण्यात येत आहे. एकप्रकारे वारकऱ्यांच्या श्रद्धा, आस्था आणि परंपरा यांना काळीमा फासणारी ही घटना आहे. वारकऱ्यांच्या सन्मानासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहनदादा जोशी (Mohan Joshi), आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), माजी मंत्री रमेश दादा बागवे (Ramesh Bagwe), संजय बालगुडे(Sanjay Balgude), वीरेंद्र किराड यांच्या नेतृत्वात सन्मान दिंडी काढण्यात आली.
यावेळी किशोर मारणे, प्रवीण करपे, गौरव बोराडे, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल, प्रथमेश आबनावे, संकेत गलांडे, पुष्कर अबनावे, दत्ता मांजरेकर, आयुब पठाण, उमेश काची, राजेश जाधव, गणेश साळुंखे, विशाल गुंड, सुरेश कांबळे, बंडू शेडगे, गोरख पळसकर, रुपेश पवार, रवी पठारे, नंदू जाधव, गणेश तामकर, संजय चव्हाण, रुपेश पवार, संतोष भुतकर, मयुरेश दळवी, साहिल राऊत, कान्होजी जेधे, भावेश पंखेवाले, सादिक बाबाजी आदी कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.(Pune City Congress: Support for pilgrimage through ‘Sanman Dindi’!)