Rahul Gandhi: Prime Minister scared of Adani issue

Rahul Gandhi: अदानींच्या मुद्द्याला पंतप्रधान  घाबरले 

नवी दिल्ली। सरकार आणि पंतप्रधान ( Prime Minister)  अदानींच्या मुद्द्याला घाबरले               (scared of Adani issue)  आहेत. मला वाटते की ते मला संसद भवनात (Parliament) बोलू देणार नाहीत. त्यांना श्रीलंका, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियामध्ये कंत्राट मिळत आहे. पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांच्यात काय झाले याचे उत्तर पंतप्रधान देऊ शकले नाहीत. संसदेत उत्तर दिल्यानंतर तुमच्याशी सविस्तर बोलेन. कारण खासदार म्हणून तेच माझे व्यासपीठ आहे.अशी रोखठोक भूमिका काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी मांडली. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यातील संबंधांवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की ,पंतप्रधानांनी सांगावे की त्यांचा अदानीशी काय संबंध आहे. माझ्या लंडनच्या भाषणात असे काहीही नव्हते.  जे मी सार्वजनिक रेकॉर्डमधून नाही काढले. हे संपूर्ण प्रकरण उद्ध्वस्त करणारे आहे.

सरकार आणि पंतप्रधान अदानींच्या मुद्द्याला घाबरले आहेत. मला वाटते की ते मला संसद भवनात बोलू देणार नाहीत. मी लोकसभेचा सदस्य आहे. माझा मुद्दा संसदेत मांडणे ही माझी जबाबदारी आहे. उद्या मला संसदेत बोलण्याची संधी मिळाली तर मी तिथे या विषयावर माझे मत सविस्तरपणे मांडेन.असेही त्यांनी स्पष्ट केले.(Rahul Gandhi: Prime Minister scared of Adani issue)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *