पुणे । भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या (BJP leader former MP Kirit Somaiya) यांनी आजपर्यंत ज्या आमदार,खासदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ते नेतेमंडळी भाजप सोबत गेल्यावर त्याचे पुढे काहीच झाले नाही. त्यावर किरीट सोमय्या काहीच बोलले नाहीत.त्याच दरम्यान शिंदे सोबत असणाऱ्या आमदार आणि खासदारवर देखील आरोप केले.पण ते सर्वजण भाजप सोबत गेल्यावर आरोप आणि कारवाई थांबली.त्यामुळे त्यावर किरीट सोमय्या यांनी भूमिका मांडावी.तसेच या सर्व घडामोडी लक्षात घेता.ईडी( ED) चुकीच्या पद्धतीने कारवाई करत आहे. त्या विरोधात न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याची माहिती ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)यांनी माहिती दिली.तसेच या पार्श्वभूमीवर राज्यभरात लवकरच जेल भरो आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की,देशातील राजकीय आणि तपास यंत्रणा मार्फत चुकीची कारवाई केली जात आहे.या विरोधात काही दिवसापूर्वी ९ पक्षाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेले आहे.त्यावर त्यांनी उत्तर दिले पाहिजे होते.मात्र त्यांनी आजपर्यंत उत्तर दिले नाही.जर ते उत्तर देणार नसतील तर किमान सेक्रेटरीने तरी उत्तर दिले पाहिजे.पंतप्रधान हे देशाचे असून ते भाजपचे नाहीत.पण त्यावर भाजपचे प्रवक्ते उत्तर देत आहेत अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी टिका केली.
त्या पुढे म्हणाल्या की, किरीट सोमय्या हे राजकारणी कमी आणि माहिती अधिकारी झाले आहेत.प्रताप सरनाईक यांच्यावर त्यांनी आरोप केला होता. सरनाईक यांनी शरणागती पत्कारली आणि त्यांनी तिकडे प्रवेश केला.आनंद अडसूळ, भावना गवळी, यशवंत जाधव,अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक यांच्या बद्दल त्यांनी पत्रकार परिषद आणि असंख्य ट्विट केले होते.पण हे सर्वजण भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन केल्यावर ईडी मार्फत सुरू असलेली कारवाई थांबते.त्यामुळे आजवर किरीट सोमय्या यांनी जेवढे आरोप केले त्याचे काय झाले .त्यावर त्यांनी भूमिका मांडावी.
जे आमच्या सोबत येणार नाही.त्या सर्वांवर कारवाई होणार हेच यामधून स्पष्टपणे दिसत आहे.या विरोधात आम्ही लवकरच राज्यभरात जेल भरो आंदोलन करणार आहे.तसेच एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून एखाद्या पक्षाच्या लोक प्रतिनिधीवर ईडी मार्फत कारवाई केली जात आहे.या विरोधात आम्ही लवकरच न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खेड येथील सभेनंतर सदानंद कदम यांच्या हॉटेलवर चहा घेण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांच्यावर देखील कारवाई झाली.यातून एकच पुन्हा एकदा स्पष्ट होते की, आमच्याकडे या ;अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार हेच दिसत आहे आणि या कारवाईची माहिती किरीट सोमय्या यांना तात्काळ कशी मिळते.सोमय्या ईडीचे कर्मचारी आहेत का ? अशा शब्दात किरीट सोमय्या यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, नारायण राणे हे भाजपमध्ये जाताच त्यांच्या वरील कारवाई थांबली. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी सगळ्या राणे कुटुंबीयावर आरोप केले होते.आता बाबा आपण किरीट काका यांचे ऐकु या असे नीतू आणि नीलू म्हणत असतील अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी राणे आणि सोमय्या यांच्यावर टीका केली.तसेच भाजप ब्लॅक चे व्हाईट करण्याचे यंत्र आहे का ? अशा शब्दात भाजपवर त्यांनी पुन्हा एकदा टीका केली.(Sushma Andhare: Jail filling movement soon across the state against ED)