Kasba - Chinchwad Assembly by-election: MNS is dancing to BJP's tune only because of 'ED' threat!

Kasba – Chinchwad Assembly by-election: ‘ईडी’च्या धाकामुळेच मनसे भाजपच्या तालावर नाचतेय! 

पुणे ।कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba – Chinchwad Assembly by-election)भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP  ) सडकून टीका केली आहे. कोथरूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला (BJP)पाठिंबा देत आहे. बोलघेवडे पोपट ‘ईडी’च्या (ED) तालावर नाचू लागले आहेत, अशी खरमरीत  टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप  (Prashant Jagtap)यांनी केली आहे.

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.मात्र  मनसेचे कार्यकर्ते -पदाधिकारी भाजपच्या पदयात्रेत सहभागी होणार नसले तरी पाठिंबा मात्र भाजप उमेदवाराला असणार आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातील मनसेची ताकद पाहता मनसेच्या या निर्णयामुळे भाजपला पोटनिवडणुकीत राजकीय फायदा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नेमक्या या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसने मनसेवर टीका केली आहे.दुसऱ्याच्या वरातीमध्ये सुपारी घेऊन किती दिवस नाचणार ? कधीतरी तुम्हीही घोड्यावर बसा, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी समाजमाध्यमातून मनसेवर टीका केली आहे.

यासंदर्भात बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, ऑक्टोबर २०१९ मधील विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जोरावर किंबहुना पाठिंब्यावरच मनसेने उमेदवार दिला होता. मनसेचे तेव्हाचे उमेदवार ॲड. किशोर शिंदे यांनी भाजपचे चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या जोरावरच कडवी लढत दिली होती. कोथरूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देत आहेत. ‘ईडी’च्या धाकामुळेच मनसे भाजपच्या तालावर नाचत आहे.(Kasba – Chinchwad Assembly by-election: MNS is dancing to BJP’s tune only because of ‘ED’ threat!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *