Shiv Sena MP Vinayak Raut: The state government led by Eknath Shinde will collapse

Shiv Sena MP Vinayak Raut: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्यातील सरकार कोसळणार 

मुंबई।मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील राज्यातील सरकार  ( state government) औटघटकेचे आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर ते 1001 टक्के कोसळणार. हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही, असे शिवसेना खासदार विनायक राऊत(Shiv Sena MP Vinayak Raut )यांनी म्हटले असून भारतीय जनता पक्ष शिंदे गटाला नारळ देण्याचा मुहूर्त शोधत आहे. याची ठोस माहिती माझ्याकडे आहे, असा दावाही राऊत यांनी यावेळी केला.

   

विनायक राऊत म्हणाले, शिंदेंच्या गटाकडून भाजपची प्रतिमा  खराब करण्याचा प्रयत्न सुरु आहे. एक आमदार सरकारी कर्मचाऱ्याला मारतो, दुसरा आमदार शेतकऱ्यांना मारतो. तिसरा महिलांना मारहाण करतो. आणि साक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भूखंड घोटाळ्यात अडकले आहेत. त्यामुळे भाजपला हे परवडणारे नाही.

धनुष्यबाणाच्या सुनावणीबाबत   विनायक राऊत म्हणाले, मला 100 टक्के आत्मविश्वास आहे की, निकाल आमच्या बाजूने लागेल. आम्ही कागदपत्रांची सगळी पूर्तता केलेली आहे. पुरावे दिलेले आहेत. जर कदाचित आमच्या बाजूने निकाल लागला नाहीच तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. तिथेही आमच्यासाठी दरवाजे उघडे आहेत. असेही त्यांनी स्पष्ट केले.(Shiv Sena MP Vinayak Raut: The state government led by Eknath Shinde will collapse)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *