‘इंडिया टुडे- सी व्होटर’च्या सर्व्हेनुसार यावेळी काँग्रेसच्या कामगिरीत किंचीत सुधारणा झाली आहे. पण त्याचा त्या पक्षाला कोणताही फायदा होताना दिसून येत नाही. कारण, भाजपला सत्तेतून बेदखल करण्याएवढ्या जागा काँग्रेसला कुठेही मिळताना दिसत नाहीत. या आकडेवारीनुसार, काँग्रेसला 100 च्या आत जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
महाराष्ट्रात भाजपची झोप उडणार
महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप-शिंदे गटाला (भाजप-शिंदे गट-रिपाइं) केवळ 14 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला 34 जागा मिळतील. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप युतीला सर्वाधिक 42 जागा मिळाल्या होत्या. तर विरोधकांना केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र यावेळी भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता असल्यामुळे हा अहवाल राज्यातील भाजप नेत्यांची झोप उडवणारा ठरणार आहे.
लोकप्रियतेत योगी आदित्यनाथ अव्वल
त्यात या सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांना 39 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली आहे. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना 16 टक्के नागरिकांनी पसंती दिली. ते या प्रकरणी दुसऱ्या क्रमाकांवर आहेत.त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिसऱ्या (7 टक्के पसंती), तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन चौथ्या (5 टक्के पसंती), ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पाचव्या (3 टक्के पसंती), आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा 6व्या (3 टक्के पसंती), मध्य प्रदेशचे सीएम शिवराज सिंह चौहान 7व्या (2.4 टक्के पसंती) क्रमांकावर आहेत.या क्रमवारीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 व्या क्रमांकावर आहेत. त्यांना केवळ 2.2 टक्के लोकांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे.
महागाई हेच सर्वात मोठे अपयश
या सर्व्हेनुसार, 25 टक्के नागरिकांनी महागाई हे एनडीए सरकारचे सर्वात मोठे अपयश असल्याचे म्हटले आहे. तर 17 टक्के मतदारांनी बेरोजगारीच्या मुद्यावर मोदी सरकारला अपयश आल्याचा दावा केला आहे. 8 टक्के नागरिकांनी कोरोना काळात एनडीए सरकारला स्थिती हाताळण्यात अपयश आल्याचाही दावा केला आहे.
‘इंडिया टुडे- सी व्होटर’च्या सर्व्हेनुसार…
आज निवडणूक झाली तर कुणाला किती जागा मिळणार? (एकूण जागा 543)
एनडीए | 298 |
यूपीए | 153 |
इतर | 92 |
कोणत्या आघाडीला किती टक्के मतदान?
एनडीए | 43 |
यूपीए | 30 |
इतर | 27 |
कोणत्या पक्षाला किती मतदान?
भाजप | 39 टक्के |
काँग्रेस | 22 टक्के |
इतर | 39 टक्के |
या सर्वेनुसार, लोकसभेची आज निवडणूक झाली तर एनडीएला अनेक राज्यांत फायदा होण्याची शक्यता आहे.
एनडीएला या राज्यात होणार फायदा?
आसाम | 12 जागा (2019 मध्ये 9 जागा) |
तेलंगणा | 6 जागा (2019 मध्ये 4 जागा) |
पश्चिम बंगाल | 20 जागा (2019 मध्ये 18 जागा) |
उत्तर प्रदेश | 70 जागा (2019 मध्ये 64 जागा) |
यूपीएला या राज्यात होणार फायदा?
कर्नाटक | 17 जागा (2019 मध्ये 2 जागा) |
महाराष्ट्र | 34 जागा (2019 मध्ये 6 जागा) |
बिहार | 25 जागा (2019 मध्ये केवळ 1 जागा) |