पुणे| ‘न जाने कितने तारे,आसमान से रोते हुए टूटे होंगे, न जाने वो ईंटो ने,खुद को कितना कोसा होगा… गुरु गोबिंद सिंहजी से सीख मिली थी,इसलिए सही और सच के लिए अड़े थे’ या काव्यातून शिखांचे दहावे धर्मगुरू गुरु गोबिंदसिंह (Guru Gobind Singhji) यांच्या हौतात्म्य पत्करलेल्या सुपुत्रांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करताना वीर साहेबजादे (Veer Sahebzade)यांना बहुभाषिक काव्यसंमेलनातून (multilingual poetry)अभिवादन करण्यात आले.
शिखांचे दहावे धर्मगुरू गुरु गोबिंदसिंह यांच्या हौतात्म्य पत्करलेल्या सुपुत्रांच्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ गुरुद्वारा गुरु नानक दरबारतर्फे (Gurdwara Guru Nanak Darbar) बहुभाषिक काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डाॅ.मधुसूदन घाणेकर हे होते तर दिग्दर्शक सतीश इंदापूरकर, ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर, संतसिंग मोखा , शैलेश बडदे,डॉ.प्रिती काळे, हेमंत बोरकर,लक्ष्मीकांत शेलार, राहुल दुर्गे, दीपिका कटरे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या काव्यसंमेलनात महाराष्ट्रातील ३० कवींनी सहभाग घेतला. गुरुद्वारा गुरु नानक दरबार पुणे कॅम्पचे अध्यक्ष चरणजितसिंह साहनी ,प्रिया दामले, दीपिका कटरे , बाबा ठाकूर, स्वाती दिवाण, सागर वाघमारे, सरला भिरुड , सुजित कदम, राजश्री वाणी, मुकुंद सहस्त्रबुद्धे यांनी सादर केलेल्या कवितांना रसिकांनी दाद दिली.
यावेळी साहेबजादे काव्य गौरव पुरस्काराचेही वितरण करण्यात आले. संयोजक व गुरुद्वारा गुरु नानक दरबार पुणे कॅम्पचे अध्यक्ष चरणजितसिंह साहनी यांनी आपल्या धर्माचा अभिमान जरूर बाळगा; पण दुसर्या धर्माचा अवमान करु नका असे आवाहन यावेळी केले.हे काव्यसंमेलन तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या सहकार्याने घेण्यात आले. सूत्रसंचालन सारिका सासवडे यांनी केले तर नरेंद्रपालसिंह बक्शी यांनी आभार मानले.