Ajit Pawar: Chandrasekhar Bawankule's 'Correct' program has been taken seriously!

Ajit Pawar: मनावर घेतले तर चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘करेक्ट’ कार्यक्रम !

नागपूर । मी एखाद्याला चॅलेंज केले ना, तर कोणाच्या बापाला ऐकत नाही. सरकार आल्यानंतर तुम्ही संधी दिलेले एक नेते बारामतीत आले. बारामतीत (Baramati)घड्याळ बंद करण्याचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करू, असे ते म्हणाले. आता मी मनावर घेतलेना तर त्यांचाच ‘करेक्ट’ कार्यक्रम करीन. जरा सबुरीने घ्या म्हणावं . खूपच स्पीडने चालले ते,असा टोला विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी नाव न घेता भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांना लगावला. 

 विधानसभेत (Vidhansabha  discussion)नियम २९३ अन्वये सुरू केलेल्या चर्चेत  अजित पवार यांनी  तुफान फटकेबाजी केली. यावेळी अजित पवार म्हणाले, उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही,त्यावर  सभागृहातून गिरीश महाजन यांना मुख्यमंत्रीपद द्यावे अशा घोषणा देण्यात आल्यावर लगेच अजित पवारांनी गिरीश महाजनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भाजप वाढवण्यास पाठवायचे आहे, त्यांचे काॅन्टॅक्ट सगळीकडे आहेत,असे भाष्य केल्याने सभागृहात हास्याचे कारंजे उसळले.

अजित पवार यांनी महाजनांची फिरकी घेताना चौफेर फटकेबाजी केली. त्यात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला लक्ष्य करताना  अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.  अजित पवार म्हणाले की, मी आता येऊन वहिनींनाच सागणार आहे की जरा बघाहो यांच्याकडे, त्यांनी मनावर घेतले की, हे एका महिलेला मंत्री करतील. राज्यात अजून एका महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळत नाही, हा महिलांचा अपमान आहे.

फडणवीस यांच्याकडे आधीच सात सात मंत्र्यांचा कारभार आहे. त्यात कोणत्याही मंत्र्याकडे काम घेऊन गेलो की, फडणवीसांना विचारतो असे सांगतात.  खरे म्हणजे तुम्ही मंत्री कोणालाही करा, पण मंत्रिमंडळ विस्तार करा, असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला. 

…सूट कधी घालणार

मंत्रिमंडळात वर्णी लागेल म्हणून अनेकांनी सुट शिवले. त्यांच्या घरचे आता विचारतात की हा सूट कधी घालणार आहे म्हणून. अनेकांचे सूट वाया चालले आहे असा उपरोधिक  टोलाही  मंत्रिमंडळ  विस्तारासाठी उशीर लागत असल्याबद्दल पवार यांनी लगावला. (Ajit Pawar: Chandrasekhar Bawankule’s ‘Correct’ program has been taken seriously!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *