Raj Thackeray: Closed door discussion with Chief Minister Eknath Shinde

Maharashtra Navnirman Sena: निवडणुकांसाठी राज्यात ‘घे भरारी’ अभियान 

मुंबई। आगामी पालिका तसेच विधानसभा निवडणुकांसाठी  (upcoming municipal and assembly elections) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी (Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray)  जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरात ‘घे भरारी’ अभियान (‘Ghe Bharari’ campaign) लवकरच राबवण्यात येणार असून  प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मेळावे, सभा घेण्यात येणार आहेत. 

 मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.ते म्हणाले,आगामी  काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘घे भरारी’ हे अभियान राबविले जाणार आहे. त्यानुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी मेळावे आणि सभा घेतल्या जाणार आहेत. मूळ प्रश्नांना भरकवटण्याचा प्रयत्न अनेक पक्षांकडून केला जात आहे. जनतेच्या मुळ समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यासाठी आवाज उठवण्यासाठी’घे भरारी’ अभियान राबवण्यात येणार आहे.  मनसे प्रमुख राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सक्रीय दिसून येत आहेत. राज ठाकरेंनी नुकताच कोकण दौरा करत येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. तसेच, पक्षवाढीसाठी आणि आगामी निवडणुकांसाठी कामाला लागण्याच्या सूचनाही केल्या. आता ‘घे भरारी’ अभियानाच्या माध्यमातून मेळावे आणि सभांच्या माध्यमातून मनसैनिक एकत्र येणार आहेत, अशी माहितीही  संदीप देशपांडे यांनी दिली.

राज्यात स्थान निर्माण करण्यासाठी… 

 दरम्यान, ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेतून विरोधकांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच, मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही जागर मुंबईचा हे अभियान सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आपली जागा निर्माण करण्यासाठीच मनसेतर्फे हे अभियान राबवण्यात येत असल्याची चर्चा आहे. (Maharashtra Navnirman Sena: ‘Ghe Bharari’ campaign in the state for elections) 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *