काँग्रेसचे आता ट्विटर ‘ वॉर’

नवी दिल्ली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर खाते ब्लॉक करण्यात आले आहे .यावरून ट्विटर विरुद्ध काँग्रेस अशी लढाई सुरू झाली आहे. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधीसह अनेक नेत्यांनी ट्विटरवर राहुल गांधी यांचा फोटो प्रोफाइल म्हणून ठेवला आहे, इतकेच नव्हे तर नावही राहुल गांधी  असे दिले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आता ट्विटरला लक्ष्य करण्यात येत असले तरी ट्विटरकडून कोणती कारवाई करण्यात येते.  याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
तुम्ही किती ट्विटर खाते बंद करणार? प्रत्येक कार्यकर्ता राहुल गांधी यांचा आवाज म्हणून तुम्हाला प्रश्न करेल. आता सर्व मिळून या आंदोलनाचा भाग होऊया. अमेरिकेत ट्विटरने द्वेष पसरू नये म्हणून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते बंद केले होते ;पण भारतातील उलट होत आहे. सरकार करत असलेल्या अन्याय व द्वेषाविरोधात राहुल गांधी आवाज उठवत आहेत.  तर त्यांच्यावर ट्विटरकडून कारवाई करण्यात येत आहे.  असे ट्विट युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी केले आहे.काँग्रेसकडून सध्या #Twitter BJPsedarGaya हे हॅशटॅग  चालवण्यात येत आहे.
दरम्यान ट्विटरकडून निवेदन जारी करण्यात आले आहे.  आम्ही नियम न्यायालयीन पद्धतीने आणि कोणताही पक्षपात न करता लागू करतो. नियमांचे उल्लंघन करणार्‍या शेकडो ट्विटर खात्यांवर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस नेत्यांनी नियमांचे उल्लंघन करणारे चित्र पोस्ट केले होते.  त्यामुळे कारवाई करण्यात आली, असे स्पष्टीकरण दिले आहे.
Twitter BJPsedarGaya hashtag from Congress

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *