मुंबई ।छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर महापुरुषांबद्दल वारंवार वादग्रस्त वक्तव्ये (controversial statements) करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)यांच्याविरोधात महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात असून विरोधक महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते (Opponent Aggressive) अधिक आक्रमक झाले आहेत. १३ डिसेंबर रोजी पुण्यात बंदला मिळालेला प्रतिसाद पाहता तसेच १७ डिसेंबर रोजी मुंबईत महामोर्चाची हाक देण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर आगामी काळात आणखी रोष वाढेल हे लक्षात घेऊन आता हा राेष कमी करण्यासाठी राज्यपाल कोश्यारींच्या उचलबांगडीच्या निर्णयास दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
महाराष्ट्रातील काही खासदारांनी (MPs of Maharashtra) केंद्रीय गृहमंत्रीअमित शहांची (Union Home Minister Amit Shaha)भेट घेत राज्यपाल हटावची मागणी केली. भाजपचे खासदार व शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी थेट पंतप्रधान, राष्ट्रपती कार्यालयाकडे तकार केली हाेती. मित्रपक्ष शिंदे सेनेच्या नेत्यांसह भाजपच्या काही नेत्यांनीही काेश्यारींच्या वक्तव्यावर नाराजी वर्तवली आहे. त्यात १९ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणाऱ्या अधिवेशनापूर्वी राज्यपाल हटावचा निर्णय झाला नाही तर विराेधक विधिमंडळात याच विषयांवर सरकारला अडचणीत आणण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे राज्यपाल कोश्यारींच्या उचलबांगडीच्या निर्णयास दिल्लीत शिक्कामोर्तब झाले आहे.
पत्राद्वारे स्पष्टीकरण;पण मागितली नाही माफी दरम्यान, महापुरुषांबद्दल आपल्या वक्तव्यांमुळे वादात सापडलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या भाषणाच्या संपूर्ण संदर्भातून एक छोटासा भाग काढून चुकीचा अर्थ लावला गेला आहे, असे नमूद करत राज्यपालांनी शहा यांना संपूर्ण वादावर मार्गदर्शन करण्याची विनंती केली. मात्र, या पत्रात त्यांनी कुठेही माफी मागितलेली नाही. ६ डिसेंबरला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, मुघल काळात शौर्य, त्याग व बलिदानाची उदाहरणे घालून देणाऱ्या महाराणा प्रताप, श्री गुरुगोविंद सिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची कल्पना स्वप्नातही करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे अभिमान आहेत.(Opponent aggressor :Governor Bhagat Singh Koshyari removed)