If Shiv Sena leader Chandrakant Khaire is supporting Shai Feki, then only he should be booked for the crime, BJP's state president Chandrashekhar Bawankule will speak to Hingolit journalists.

BJP state president Chandrashekhar Bawankule:चंद्रकांत खैरेंवरही गुन्हा दाखल करा

हिंगोली। शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Shiv Sena leader Chandrakant Khaire) शाईफेकीचे समर्थन करीत असतील तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे,अशी भूमिका  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  (BJP state president Chandrashekhar Bawankule)यांनी   हिंगोलीत (Hingoli) पत्रकारांशी बोलताना मांडली.

 भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की,  शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शाईफेकीचे समर्थन केले तर आम्हीही इतर पक्षांच्या पदाधिकारी, नेत्यांवर शाईफेकीचे समर्थन करायचे का? असा सवाल  केला. 

नेत्यांवर शाईफेक करणे, त्यांचा अपमान करणे याचे जर खैरे समर्थन करीत असतील तर त्यांना महाराष्ट्राची संस्कृती माहिती नाही. खैरे यांनी या घटनेला समर्थन देऊन एक प्रकारे अशा घटना पुन्हा घडाव्यात यालाच उत्तेजन दिल्याचा आरोप  बावनकुळे यांनी  यावेळी  केला. अशा घटनांचे समर्थन करणे, जनतेला भडकविणे हा गुन्हा आहे. खैरे यांनी केलेले विधान आपण ऐकले नाही. मात्र ते या प्रकाराचे समर्थन करीत असतील तर ते गुन्हेगार ठरतात, असेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी मंत्री सूर्यकांत पाटील, दिव्यांग आघाडीचे प्रदेश पदाधिकारी रामदास पाटील सुमठाणकर, माजी आमदार गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, ॲड. शिवाजी जाधव उपस्थित होते.

पक्ष बघून निधी दिला जात नाही यावेळी बावनकुळे म्हणाले की, गावात जास्तीत जास्त विकास करण्यासाठी प्रत्येक आमदारांनाच सरपंच आपल्या गटाचा व्हावा, असे वाटत असते. मात्र त्यानंतरही विकास थांबत नाही. केंद्र शासनाच्या वित्त आयोगाचा निधी सर्वच ग्रामपंचायतींना दिल्या जातो. त्यामध्ये पक्ष बघितला जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *