नागपूर
संसदेत सुरू असलेल्या गोंधळावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पार्टीची दशा झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
विरोधकांना संसदेत काम करू द्यायचे नाही, यासाठी ते गोंधळ आणि धिंगाणा मस्ती करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
संसदेच्या सभागृहात इतिहासात कलंक लावणारा गंभीर प्रकार घडला आहे. ज्यांनी गोंधळ घातला. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. वर्षभरासाठी त्यांना निलंबित केलेच पाहिजे. भाजप आणि आरएसएस संविधान दाबण्याचे काम करत आहे,या राहुल गांधी यांच्या आरोपावर भाष्य करताना आठवले म्हणाले, संविधानाच्या आधारावर काम करत आहोत. सबका साथ सबका विकास हेच धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आहे .पंतप्रधान मोदी हे संविधानासमोर डोके टेकवतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील भारत उभा ते करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विरोधकांचे आरोप चुकीचे आहेत.
