मुंबई।कर्नाटकच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणे बरे नव्हे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी (Rohit Pawar’s allegation) शिंदे सरकारवर (Eknath Shinde-Fadnavis government) करताना पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकते, तसे मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवले नाही?, असा सवाल केला आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद (Karnataka-Maharashtra borderism)पुन्हा एकदा पेटलाय. सुप्रिया सुळे यांनीही लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला. याप्रकरणी गृहमंत्री अमित शहांनी बोलावे, अशी मागणी त्यांनी केली.त्यात आमदार रोहित पवार यांनीही ट्विटरवरून शिंदे सरकारवर तोफ डागली आहे. सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारकडून मुळमुळीत भाषा कशासाठी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांनी तिखट शब्दात राज्य सरकारचा समाचा घेतला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, आपल्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू… करू… केंद्राशी बोलू… ही मुळमुळीत भाषा कशासाठी? कर्नाटकच्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणे बरे नाही, असे म्हणत त्यांनी सरकारचे कान टोचलेत. वैयक्तिक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी ‘कलाकारी’ सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकते, तसे मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवले नाही?, असा सवालही रोहित पवार यांनी केला आहे.(Rohit Pawar’s allegation: Maharashtrians are not ready tPreview (opens in a new tab)o betray for Karnataka elections)
काय आहे प्रकरण ?
जत तालुक्यातल्या (जि. सांगली) गावांनी पाणीप्रश्नी आक्रमक होत कर्नाटकात जायचा इशारा दिला. त्यानंतर अक्कलकोट, पंढरपूरमध्येही अशीच मागणी झाली. सुरगाणा तालुक्यातल्या (जि. नाशिक) नागरिकांनी गुजरातमध्ये तर नांदेड जिल्ह्यातल्या गावांनी तेलंगणामध्ये जायची मागणी केली. त्यात मंगळवारी कन्नड रक्षण वेदिका संघटनेने कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे राज्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.एकनाथ शिंदे – फडणवीस सरकार मात्र सुस्त असल्याने त्यांच्यावर टीकाही होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याप्रकरणी लोकसभेत आवाज उठवला. तर रोहित पवार यांनी याप्रश्नी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.