सिंधुदुर्ग । मुस्लिम मते दूर जातील, या भीतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कधीही जाहीर भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. केवळ शाहु-फुले-आंबेडकरांचेच नाव घेतात, असा जुनाच आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray’s allegation against Sharad Pawar)पुन्हा केला आहे.शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीय राजकारण (caste politics) सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेसनेच आपल्या फायद्यासाठी मराठा व इतर समाजात फूट पाडली असा दावाही केला आहे.
पक्षबांधणीसाठी राज ठाकरे सिंधूदूर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले, सध्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्य तसेच चित्रपटातील शिवइतिहासाबाबत वाद सुरू आहेत. मात्र, हे वाद जाणूनबुजून निर्माण केले जात असून याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रात असे जातीय वाद होत नव्हते किंवा फार कमी प्रमाणात होत होते. तेव्हा काय माणसं इतिहास वाचत नव्हती का? आता सगळेजण वाचायला लागलेत का?, असा प्रश्नही राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीने 1999 पासून महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू केले. शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. मात्र, त्यांनी काही टोळ्या निर्माण केल्या आहेत. त्यांचा वापर करून मराठा व इतर समाजात फूट पाडली जाते. नंतर दोन्ही समाज आपल्या खिशात घालायचे, असे पवार यांचे राजकारण आहे.असेही राज ठाकरे म्हणाले.(Raj Thackeray’s allegation against Sharad Pawar)
समान नागरी कायद्यासाठी मनसे आग्रही
राज ठाकरे म्हणाले, समान नागरी कायदा लागू करा, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. मात्र, केवळ राज्यात हा कायदा लागू करता येणार नाही. याबाबत केंद्राला कायदे बनवण्याचे अधिकार आहेत.