मुंबई ।’तुम्हाला 30 जूनला चांगलाच हात दाखवला. आम्ही जे करतो, ते निधड्या छातीने करतो. कर्नाटकचा विषय म्हणाल, तर 2012 चा हा विषय आहे. तेव्हा कुणाचे सरकार होते? मी कर्नाटक आणि महाराष्ट्र बेळगाव सीमा आंदोलनात चाळीस दिवस तुरुंग भोगला. तुम्ही अडीच वर्षे काय केले?’ असा थेट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Eknath Shinde’s question to Uddhav Thackeray) केला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी यापूर्वीही माझे मत मांडले आहे, गेले चार -पाच महिने जे काम आम्ही करीत आहोत. त्यामुळे ठाकरे गटांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या राज्यात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही. छत्रपती शिवरायांशी तुलना सहन करू शकत नाही. विरोधीपक्ष घाबरला असून ते मुद्दाम याविषयावर आवाज उठवत आहेत.असा दावाही केला.उलट छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचे कुणाला अधिकार आहेत? बाळासाहेबांचे विचार, त्यांचे हिंदुत्व मोडून तोडून टाकणाऱ्यांना अधिकार आहे? आमच्यावर टीका करण्याचा त्यांना अधिकार नाही.असा पवित्राही घेतला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता टीका केली की, सत्तेच्या खूर्चीसाठी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार मोडले. हिंदुत्वाचे विचार तोडले. ‘काॅप्रमाईज ‘केले, त्यांना आम्हाला शिकवण्याचा अधिकार नाही.
आम्हाला आत्मविश्वास होता…
कामाख्यादेवीला आम्ही जाहीरपणे सांगितले की, होय, आम्ही जाणार. कुठल्याही मंदिरात जाण्यासाठी कुठलाही अडथळा वाटत नाही. आम्ही जे करतो ते उघड करतो. आम्ही लपून छपून करीत नाही. दिवसा ढवळ्या करतो. काही लोक लपून छपून करतात. आम्हाला शिकवण्याची गरज नाही. आम्ही हात दाखवला असे म्हणत असाल तर मी म्हणेल की, आम्हाला आत्मविश्वास होता. त्यामुळेच पन्नास आमदार आणि तेरा खासदार माझ्यासोबत आले. असेही ते म्हणाले.