अनुसूचित जाती आयोगाचे अकाऊंट का बंद केले नाही?
नवी दिल्ली
अनुसूचित जाती आयोगाचे अकाऊंट का बंद केले नाही. आयोगानेही तेच फोटो ट्विट केले होते. जे आमच्या एका नेत्याने केले होते, असे ट्विट काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी केले आहे.शिवाय ट्विटर मोदी सरकारचे धोरण राबवतय का? अशा शब्दात ट्विटरवर त्यांनी निशाणा साधला आहे.
राहुल गांधी, काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांचे अकाऊंट बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी या संतप्त झाल्या आहेत.त्यांनी ट्विट करून ट्विटरला सवाल केला आहे.
लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी ट्विटर भारतात भाजप सरकारला साथ देत आहे असा आरोपही प्रियांका गांधी यांनी केला आहे काँग्रेस नेत्यांचे अकाऊंट बंद करून ट्विटर आपल्या धोरणांचा पालन करते की मोदी सरकारच्या? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आता यावर ट्विटर वरून कोणती भूमिका घेतली जाते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
