मुंबई ।बेळगाव सीमाप्रश्न अजून सुटलेला नसताना कर्नाटक राज्य आता कोल्हापूरच्या पुढे जाऊन सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करत आहेत. तरीही शिंदे सरकार गप्प आहे (Shinde government is silent). हे सरकार लवकर गेले नाही तर महाराष्ट्राचे तुकडे होतील (Maharashtra will be divided) असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, कुणाला महाराष्ट्रातून मुंबई तोडायची आहे, कुणाला गाव, जिल्हे तोडायचे आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र कुरतडण्याचे काम सुरू आहे. तरीदेखील आता आमचे मुख्यमंत्री त्यांच्या 50 आमदारांसह गुवाहाटीला जात आहे. ते गुवाहाटीला गेल्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना महाराष्ट्राचा काही भाग मागितला नाही म्हणजे मिळवलं , असा उपरोधिक टोलाही राऊतांनी लगावला. बेळगाव सीमाप्रश्न अजून सुटलेला नसताना कर्नाटक राज्य आता कोल्हापूरच्या पुढे जाऊन सांगली जिल्ह्यातील तालुक्यावर दावा करत आहेत. तरीही शिंदे सरकार गप्प आहे. हे सरकार लवकर गेले नाही तर महाराष्ट्राचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही.
शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करूनही राज्यपालांनी अद्याप माफी मागितलेली नाही. फडणवीस त्यांचे समर्थन करत आहेत. तर, मुख्यमंत्री शिंदे गप्प आहेत. असे सरकार सीमा प्रश्न काय सोडवणार? असा सवालही राऊत यांनी यावेळी केला. (Sanjay Raut: Plot to break up Maharashtra)