नवी दिल्ली।केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष नाव, चिन्ह गोठवल्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेने दाखल केलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court today rejected the petition filed by the Shiv Sena)आज फेटाळली. निवडणूक आयोगाला (Central Election Commission) तातडीने यासंबंधी अंतिम निर्णय घेण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.त्यामुळे आता चिन्ह कुणाच्या पारड्यात पडणार हा मुद्दा राजकीय वर्तुळात पुन्हा महत्वाचा ठरणार आहे.
शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते कि, धनुष्यबाण चिन्हासाठी ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 8 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने एक निर्णय घेतला. धनुष्यबाण आणि शिवसेना नाव गोठवून शिंदे गट आणि ठाकरे गटाला स्वतंत्र चिन्ह आणि नाव दिले होते. हा निर्णयघाईगडबडीत घेतला. नियमांचे पालन या निर्णयावेळी झाले नाही. आता अंधेरी पोट निवडणूकही संपली. ज्या कारणासाठी धनुष्यबाण गोठवले, तेच कारण आता राहीलेले नाही.
निवडणूक आयोगाचा चिन्ह गोठवण्याचा अधिकार असून कोर्टाच्या आदेशानंतर अंतिम निर्णय आयोगाला तातडीने घ्यावा लागणार आहे. चिन्ह गोठवताना आमची बाजू ऐकली नाही. समोरासमोर युक्तिवाद न ऐकता निर्णय घेतला. जरी अधिकार मान्य असले तरी प्रक्रीयांबाबत ठाकरे गटाला आक्षेप होते. मात्र आता आयोगाच्या कामकाजात न्यायालय दखल घेणार नाही, हे या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे. धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय तात्पुरता झाला आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे आता चिन्हावरील लढाई ही निवडणूक आयोगातच होईल(Shiv Sena: The battle of the symbol is now in the Election Commission) हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता चिन्ह कुणाच्या पारड्यात जाईल हे आयोगाच्या निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे.