मुंबई ।महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनाच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) पाठीशी उभे होते. त्यांच्यामुळेच ‘ट्रान्झिशन’ योग्य प्रकारे होऊ शकले, अशी जाहीर कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी (Devendra Fadnavis’ Public Confession)पहिल्यांदाच दिली. परिणामी शिवसेनेत (Shiv Sena)फूट पाडण्याच्या खेळीमागे कोण होते, हे प्रथमच समोर आले आहे.शिवाय हे भाजपचेच कारनामे यावर आता खऱ्याअर्थाने शिक्कामोर्तबही झाले आहे.
शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकवून वेगळी ‘चूल ‘ मांडणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनीही यापूर्वी आपल्यामागे ‘महाशक्ती’ असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या बंडामागे भाजप असल्याचे उघड झाले. त्यानंतर फडणवीसांनी थेट अमित शहांचे नाव घेतले आहे. त्यांच्यामुळे हे परिवर्तन सुरळीत घडल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
फडणवीस म्हणाले की, अमित शहा हे संवेदनशील मनाचे आहेत. त्यांच्यात नेतृत्व क्षमता आणि प्रचंड निर्णय क्षमता आहे. आपल्याला माहितच आहे की आज महाराष्ट्रात परिवर्तन झाले. आपल्यासोबत शिवसेनेने बेईमानी केली. त्या बेईमानीला छेद देत, बेईमानांना जागा दाखवत पुन्हा एकदा बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही शिंदे यांच्या नेतृत्वात एकत्र आली. या सगळ्या ट्रान्झिशनच्या काळामध्ये भक्कमपणे जर आमच्या पाठिशी कोणी उभे होते, तर ते अमितभाई शहा उभे होते. त्यामुळे ट्रान्झिशन योग्य प्रकारे होऊ शकले.अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली. (Devendra Fadnavis’ Public Confession:Amit Shah behind the change of power in Maharashtra)