Former Chief Minister of the state and former Union Home Minister Sushil Kumar Shinde expressed his regret that he lost the post of Chief Minister of Maharashtra due to the conspiracy in the party. He also made a statement that now gradually the citizens of my constituency are forgetting me. He was speaking as the chief guest at the award ceremony on Monday (September 19) at Gujarati Bhawan of Gujarati Mitra Mandal in Solapur city.

Sushilkumar Shinde:पक्षातील कटकारस्थानामुळे मुख्यमंत्री पद गमावलं 

सोलापूर ।पक्षातील कटकारस्थानामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद गेल्याची खंत राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे  (Sushilkumar Shinde)यांनी व्यक्त केली. तसेच  आता हळूहळू माझ्या मतदारसंघातील नागरिक मला विसरून चाललेत, असे विधानही त्यांनी केले. 

   सोलापूर शहरातील (Solapur city) गुजराती मित्र मंडळाच्या गुजराती भवन (Gujarati Mitra Mandal in Solapur city)येथे  सोमवारी (19 सप्टेंबर) रोजी    पुरस्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी  जुन्या आठवणी ताज्या करताना  शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. मी मुख्यमंत्री असताना मला कटकारस्थान करून काढण्यात  राज्यपाल म्हणून आंध्रप्रदेश येथे पाठविण्यात आले. ज्यांनी कटकारस्थान केले , आज ते पराभवातच आहेत असा टोलाही  शिंदे यांनी   लगावला.
पक्षातील कटकारस्थानामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद गेल्याची खंत  बोलून दाखवताना पक्षातील कारस्थान सर्वांना माहिती आहे.असे स्पष्ट करून  मला कसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन हटविण्यात आले, राज्यपाल म्हणून आंध्रप्रदेशला पाठवले. मी त्यानंतर दिल्लीच्या मंत्रीमंडळात गेलो. मात्र त्यांना जो पराभव पत्करावा लागला तो अजूनपर्यंत  आहे.हेही त्यांनी नमूद केले. (Sushilkumar Shinde: Lost the post of Chief Minister due to party conspiracy)
 
जावयाला सांभाळायचे म्हटल्यावर… 
मुख्यमंत्री पदावर असताना गुजराती समाजाला आरक्षण दिले होते. कारण माझा जावईही गुजराती आहे आणि त्या समाजासाठी मला ते करावे लागले. जावयाला सांभाळायचे म्हटल्यावर हे सगळे करावे लागते. हे सगळे केल्यामुळे मी तिथे पुन्हा निवडून आलो, साधी गोष्ट नव्हती. पण आता हळूहळू माझ्या मतदारसंघातील नागरिक मला विसरून चाललेत,(citizens of my constituency are forgetting me) असे ही ते म्हणाले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *