बारामती।हे ‘ईडी’ सरकार,सत्ता कशी मिळेल यासाठी साम दाम दंड भेद वापरून ५० खोके ऑल ओकेवाले हे सरकार सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आलेले नाही. त्यांनी सत्ता ओरबडून आणली आहे.अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी टीका केली आहे.
मंत्रालय आणि विधान भवन परिसरात चार शेतकऱ्यांनी विविध मार्गाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याअगोदर सुभाष देशमुख या शेतकऱ्याने अंगावर रॉकेट घेऊन स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका ८८ वर्षीय शेतकऱ्याने पोलिसांना धमकी देत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर एका शेतकरी महिलेने सुद्धा स्वत:चा जीव देण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे आता या शेतकऱ्याने थेट शोले स्टाईल आंदोलन करत मंत्रालयाचे टेरेस गाठले. यापार्श्वभूमीवर बोलताना खासदार सुळे यांनी टीका केली. त्या म्हणाल्या की, हे सरकार सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आलेली नाही. त्यांनी सत्ता ओरबडून आणली आहे. दुर्दैवाने यात महाराष्ट्रातील जनता भरडली जात आहे.(Supriya Sule: ’50 boxes, all okwale’ government is not in the interest of the people) महागाईच्या प्रश्नावर बोलताना सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील जनता महागाईने भरडली जात आहे. मात्र मूलभूत प्रश्नांना बगल देण्यासाठी भाजप (BJP)मोठी खेळी खेळत आहे. मूळ प्रश्न सोडून इतर गोष्टीत जनतेला गुंतवले जात आहे.