अतिरिक्त मुख्य सचिवांना गंडवण्याचा प्रयत्न अयशस्वी
मुंबई
स्वार्थासाठी कोण कधी काय करेल याचा नेम नाही. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना एका अज्ञात व्यक्तीने फोन केला, तो फोन बदल्यांबाबत होता. त्या व्यक्तीने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करून मुख्य अतिरिक्त सचिवांना गंडवण्याचा प्रयत्न केला.

सध्या अधिकार्यांच्या बदल्यांवरून जोरदार राजकारण सुरू आहे. अनेकदा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना याच बदलीच्या कारणावरून धारेवर धरले आहे. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. त्या व्यक्तीने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करून यामध्ये अमुक एका अधिकाऱ्याची ठिकाणी अमुक ठिकाणी बदली करावी, अशी शिफारस केली. मात्र संशय आल्याने अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी या फोनची फेरतपासणी केली. त्यात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडून असा कोणताही फोन आला नाही. हे निदर्शनास आले. त्यामुळे हा ‘फेक फोन’ चा प्रकार उघडकीस आला. यासंदर्भात आशिष कुमार सिंह यांनी गावदेवी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे.