मुंबई ।दहीहंडीचा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना गोविंदा थरावर थर रचत या हंड्या फोडताना दिसत दिसत असताना दुसरीकडे राजकीय टोलेबाजी रंगत आहे. आम्ही ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना नाव न घेता लगावला आहे. इतकेच नाहीतर यापुढे असेच थर वाढत जातील , असा विश्वास देखील मुख्यमंत्री शिंदेंनी ( CM Eknath Shinde) व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका येथील मानाच्या दही हंडी उत्सवाला हजेली लावली. यावेळी स्टेजवर येताच, ‘या वेळेचा गोविंदा जोरात ना?’, अशी साद घालत जबरदस्त राजकीय टोलेबाजी मुख्यमंत्र्यांनी केली. राज्य सरकारने गोविंदाना विम्याचे कवच तर दिलेच मात्र त्यासोबतच या दहीहंडीला खेळाचा दर्जाही दिला. पुढच्या वर्षी प्रो-कबड्डी प्रमाणे प्रो-गोविंदा होईल आणि नोकरीत गोविंदांना पाच टक्के आरक्षण मिळेल, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी (CM Eknath Shinde) जाहीर केले.
दीड महिन्यापूर्वी आम्हीदेखील ५० थरांची हंडी फोडली. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला दहीहंडीचा उत्सव आता संपूर्ण महाराष्ट्रात गेला आहे. मुंबईतला प्रत्येक गोविंदा टेंभीनाका या ठिकाणी येऊन सलामी देऊन जातो. आपला इतिहास आणि परंपरा हीच आहे ही परंपरा वाढवण्याचे आणि पुढे घेऊन जाण्याचे , जोपासण्याचे काम आपण करत आहोत.असेही ते म्हणाले.(CM Eknath Shinde’s criticism of Uddhav Thackeray)