मुंबई ।बंडखोर आमदार दीपक केसरकर, उदय सामंत यांच्यानंतर आता राजन साळवी हे शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शिवसेनेचे उपनेते असलेले साळवी हे गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील आमदारांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच साळवी यांनी भेट घेतल्याने उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray group) आणखी एक धक्का बसणार (Shock to Uddhav Thackeray group: Rajan Salvi will leave Shiv Sena) असल्याची चिन्हे आहेत.मात्र रिफायनरीवरून ‘पारा’यण घडले असल्याचे बोलले जात आहे.
कोकणात एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आमदारांमुळे शिवसेनेत मोठी अस्वस्थता आहे. आता राजन साळवी हेही शिंदे गटात सामील होणार असल्याचे समजते. साळवी यांनी शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र तेदेखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा असून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांपैकी एक असलेला लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदार संघाचे राजन साळवी आमदार आणि शिवसेनेचे उपनेते आहेत.
काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत कोकण दौऱ्यावर आले होते. त्यांनी देखील रिफायनरीबाबत अनुकूल भूमिका घेतली. या प्रकल्पामुळे कोकणात रोजगार निर्मिती होईल, असे मत त्यांनी मांडले होते. कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी विरोध केला आहे. तर आमदार राजन साळवी यांनी अधिक आक्रमकपणे या प्रकल्पाचे समर्थन केले होते. त्यामुळे साळवी शिंदे गटात जाण्याची शक्यता अधिक आहे. राजन साळवी हे महाराष्ट्र विधानसभेवर २००९, २०१४ आणि २०१९ साठी सलग तीन वेळा निवडून आले आहेत.(Shock to Uddhav Thackeray group: Rajan Salvi will leave Shiv Sena)