मुंबई ।भारत देश कृषीप्रधान आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा महत्वाचा असूनही केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. जीडीपी घसरत असताना तो सावरण्याएवेजी डीपी बदलण्याचे आवाहन केले जातेय, असा आरोप करत बळीराजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बोलताना सर्वांनी ‘जय बळीराजा’ म्हणा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole)यांनी केले शिवाय वंदे मातरम् बद्दल आम्हाला आक्षेप नाही मात्र त्यासाठी कोणावर जबरदस्ती करता येणार नाही अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली आहे. (Nana Patole: No objection to Vande Mataram; but it cannot be forced)
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mugantiwar) यांना टोला लगावताना , वंदे मातरम् बद्दल आम्हाला आक्षेप असण्याचे कारण नाही. आम्हाला त्याचा अभिमानच आहे पण त्यासाठी कोणावर जबरदस्ती करता येणार नाही,असे म्हटले आहे.
शेतकरी आपल्या देशाच्या कणा आहे. त्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महत्वाचे विषय दुसरीकडे वळवण्यासाठी धर्माच्या आधारावर काही मुद्दे पुढे केले जात असतील तर ते बरोबर नाही.असेही पटोले म्हणाले.
आपल्या देशाचा अन्नदाता असुरक्षित व दुर्लक्षित आहे, जीडीपी शेतीवरच आधारीत आहे. जीड़ीपी ऐवजी डीपी बदलण्याचे सांगितले जाते म्हणूनच आम्ही बोलताना सर्वांनी बळीराजाची आठवण रहावी म्हणून जय बळीराजा बोलावे अशी भूमिका घेतल्याचे पटोले यांनी सांगितले.