Ramdas Athawale: So the split in the Mahavikas Front is inevitable

Ramdas Athawale: मुनगंटीवार जे बोलले त्यात गैर नाही,वंदे मातरम बोलणे योग्यच

नाशिक ।फोनवर हॅलो बोलण्यापेक्षा वंदे मातरम (Vande Mataram) बोलणे योग्य आहे. हॅलो हा इंग्रजी शब्द आहे. त्यामुळे मराठीत वंदे मातरम बोलायला पाहिजे. मुनगंटीवार जे बोलले त्यात गैर नाही, असे  रोखठोक मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनी मांडले आहे.

राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार (state minister Sudhir Mungantiwar) यांनी कर्मचाऱ्यांना फोनवर बोलताना हॅलो ऐवजी वंदे मातरम  बोलावे, असे फर्मान सोडल्यानंतर राजकारणात वादंग निर्माण झाला आहे. अनेकांनी आक्षेप घेतला आहे. इतकेच काय संविधानानुसार अधिकार काय काय याकडेही लक्ष वेधले आहे. एकीकडे  विरोधकांनी मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा विरोध करत असताना  काही नेत्यांनी मुनगंटीवार यांचे समर्थन केले आहे. रामदास आठवले यांनीही मुनगंटीवार यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. फोनवर हॅलो बोलण्यापेक्षा वंदे मातरम बोलणे योग्य आहे. हॅलो हा इंग्रजी शब्द आहे. त्यामुळे मराठीत वंदे मातरम बोलायला पाहिजे. मुनगंटीवार जे  बोलले त्यात गैर नाही असे रामदास आठवले म्हणाले.(Ramdas Athawale: There is nothing wrong in what Mungantiwar said, it is right to say Vande Mataram) 
 
राज्यात एक  मंत्रिपद मिळावे 
आमच्या पक्षाला राज्यात एक मंत्रिपद मिळावे ही आमची मागणी आहे. तसेच १२ आमदारांच्या यादीत आम्हाला देखील स्थान मिळावे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.२०२४मधील निवडणुकीत आम्हाला मोठ्या प्रमाणात जागा मिळतील. भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी पंतप्रधान काम करत आहेत. घराणेशाही विरोधात मोदी काम करत आहेत. अनेक योजनांचा लाभ नागरिकांना मिळत आहे. मराठा समाजाला  आरक्षण मिळाले पाहिजे.    ओबीसी समाजालाही   राजकीय आरक्षण मिळावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असेही यावेळी रामदास आठवले म्हणाले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *