जळगाव ।अजूनही मंत्रिमंडळाचा (Cabinet expansion)विस्तार बाकी आहे, निश्चितच पंकजा मुंडे यांचा पक्षश्रेष्ठी गांभीर्याने विचार करतील,अशी भूमिका भाजप नेते गिरीश महाजन (BJP leader Girish Mahajan) यांनी मांडली.
शिंदे – फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government)स्थापन झाले असले तरी भाजपच काय शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यातही भाजपच्या आक्रमक नेत्या पंकजा मुंडे (BJP’s aggressive leader Pankaja Munde) या नाराज असल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे भाष्य केले तसेच जळगाव जिल्ह्याच्या विकासासंदर्भात नवीन सरकारच्या चांगल्या योजना असल्याचे आश्वासनही दिले. त्याचबरोबर हे डबल इंजिनचे सरकार असल्याने राज्याचा विकास जोरात होईल असेही ते म्हणाले.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना पक्षाला वाटले असेल मी पदाला योग्य नाही. त्यामुळे मला पद मिळाले नसेल. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्याच पार्श्वभूमीवर महाजन यांनी आताच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा ताईंना स्थान मिळणार का, तसेच त्यांच्या नाराजीबाबत प्रश्न उपस्थित केल्यावर याबाबत निश्चितच योग्य मार्ग निघेल.
पंकजाताई पक्षाच्या नेत्या आहेत, त्यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी निश्चितच गांभीर्याने योग्य विचार करतील. त्या नाराज आहेत, असे आम्हाला वाटत नाही. तसेच मंत्रिमंडळ विस्तार अजून बाकी आहे. त्यामुळे आणखी बरेच जणांना संधी मिळणार आहे. त्यामुळे त्याची काळजी करण्याचे कारण नाही,असे महाजन यांनी स्पष्ट केले. (Girish Mahajan: Cabinet expansion yet to come, party leaders will definitely consider Pankajatai seriously)