In today's stressful life, the moments of love and affection that come from relationships are very important to us. Assuring to strengthen the unbreakable bond of our relations, the police of Dattawadi Police Station promised to the sisters in the Rakshabandhan program that they will always be vigilant for the protection of the society as well as the protection of women. No festival can be celebrated for policemen who are always ready to protect the society. For the last 10 years, Rakshabandhan program is being organized with the police in Duttawadi Police Station on the initiative of former Deputy Mayor Aba Bagul, Congress Youth Leader Amit Bagul

Amit Bagul’s Rakshabandhan activities:समाज रक्षणाचे ‘त्यांनी ‘ दिले वचन !

दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमवेत रक्षाबंधन उत्साहात 
पुणे|  आजच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांमधून निर्माण होणारे प्रेम आणि आपुलकीचे क्षण आमच्यासाठी खुपच महत्वाचे आहे. या आपल्या नात्यांचे अतूट बंधन दृढ करण्याची ग्वाही देताना समाजाच्या रक्षणाबरोबर महिलांच्या संरक्षणासाठी सदैव दक्ष राहू असे वचन दत्तवाडी पोलीस स्टेशनमधील  (Dattawadi Police Station)पोलिसांनी रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan program) कार्यक्रमात भगिनींना   दिले. 
 समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीसबांधवाना कोणताही सण साजरा करता येत नाही. घरापासून लांब असलेल्या या पोलिसांना काही काळ जिव्हाळ्याचा क्षण अनुभवता यावा आणि समाजव्यवस्था आणि त्यांच्यात विश्वासाचे, जिव्हाळयाचे नाते निर्माण व्हावे या उद्देशाने गेल्या १० वर्षांपासून माजी उपमहापौर आबा बागुल ,  काँग्रेसचे युवा नेते  अमित बागुल यांच्या (former Deputy Mayor Aba Bagul, Congress Youth Leader Amit Bagul)  पुढाकाराने दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमवेत रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.  
समाजाच्या रक्षणासाठी  सतत दक्ष असणाऱ्या पोलिसांना कर्तव्य बजावताना वेळेचे बंधन नाही, पर्यायाने कुटुंबासमवेत सण साजरा करताही येत नाही. सतत ताणतणावात असणारे पोलीस मात्र दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये यंदा ११व्या वर्षीही  झालेल्या  रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामुळे तणावविरहित दिसले.
   यावेळी   वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन ,पीएसआय श्री. कामठे, संयोजक अमित बागुल  आणि पोलीसवर्ग तसेच उज्ज्वला खरात, मीना गोकास, शर्मिला गायकवाड, लक्ष्मी पवार, सागर आरोळे, इम्तियाज तांबोळी, महेश ढवळे,सूरज सोनवणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.  (Amit Bagul’s Rakshabandhan activities)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *