CM Eknath Shinde's advice: Everything is forgiven for Hindutva, Nitesh Rane's language has changed

CM Eknath Shinde’s advice:हिंदुत्वासाठी सर्व काही माफ,नितेश राणेंची भाषाच बदलली! 

मुंबई । सत्तेच्या सारीपाटात कधी काय घडेल याचा नेम नसतो आणि एकमेकांना पाण्यात पाहणारे कधीही गळ्यात गळे घालू शकतात हे केवळ राजकारणातच पाहावयास मिळते.असेच चित्र आता शिंदे -भाजपा गट  युती झाल्यानंतर पाहावयास मिळत आहे.  शिंदे- देवेन्द्र फडणवीस  (Shinde-Devendra Fadnavis government) सरकारमधील  अनेक नेत्यांची भाषा बदलली आहे. त्यात उद्धव ठाकरे   परिवारावर (Uddhav Thackeray family) नेहमी सडकून टीका करणारे राणे कुटुंबीय  आता बॅकफूटवर गेले आहेत. एवढेच काय आता हिंदुत्वासाठी सारं काही माफ असा नवा पवित्रा नितेश राणे  (Bjp MLA Nitesh Rane)  यांनी घेतला आहे.

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणीच कोणाचा कायमचा मित्र नसतो. हे वाक्य अलीकडे सातत्याने सिद्ध होऊ लागले आहे. कालपर्यंत एकत्र असलेले मित्रपक्ष म्हणून काम करणारे आज एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे  ठाकले आहेत. तर, कालपर्यंत एकमेकांना  पाण्यात पाहणारे आज एका ताटात जेवत आहेत.
कालपर्यंत   भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार नितेश राणे  हे सातत्याने शिवसेना (shivsena) , ठाकरे परिवारावर टीका करताना दिसायचे.मात्र शिंदे गट-भाजपा   एकत्र आल्यानंतर सत्ता स्थापन झाली तशी  अनेकांची भाषाही  बदलली आहे. तशीच नितेश राणे यांचीही भाषा बदलली. ठाकरे कुटुंबीयांवर आरोप करू नयेत असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आता नितेश राणे यांची ही भाषा बदलली आहे.
ठाकरे कुटुंबीयांबद्दल चकार शब्द  उच्चारता नितेश राणे  यांची  पहिलीच पत्रकार परिषद झाली.  नितेश राणे म्हणाले की, आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलो आहोत. हिंदुत्व हाच आमच्यातला मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे आता फक्त हिंदुत्वावरच बोला असे राणे म्हणाले. त्यामुळे  हिंदुत्व नेमके कोणते हा प्रश्न  आता राजकीय वर्तुळात अनेकांना   पडला आहे. CM Eknath Shinde’s advice: Everything is forgiven for Hindutva, Nitesh Rane’s language has changed

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *