नवी दिल्ली । नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडीकडून सुरू असलेल्या तपासादरम्यान यंग इंडियाचे कार्यालय सील केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) घाबरत नाही. त्यांनी जे करायचे ते करावे. संविधानाच्या रक्षणासाठी लढा देणे हे आमचे काम आहे. देशाच्या सन्मानासाठी लढा, ही लढाई सुरूच राहणार आहे. आता सत्याग्रह होणार नाही, आता रण होईल. (Rahul Gandhi: We are not afraid of Modi)असा इशाराही दिला आहे.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर भाजप प्रवक्ते संबित पात्रा (BJP spokesperson Sambit Patra)म्हणाले, देशाचा कायदा सर्वांसाठी एक आहे. तो काँग्रेस अध्यक्ष किंवा काँग्रेसच्या माजी अध्यक्षांसाठी बदलू शकत नाहीत. त्यांना भारताच्या कायद्याशी संघर्ष करायचा आहे. त्यांना कायद्याविरुद्ध लढू दिले जाणार नाही किंवा त्यांना पलायन करू दिले जाणार नाही.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात (investigation by ED in the National Herald case)अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी दिल्लीतील हेराल्ड बिल्डिंगमध्ये असलेल्या यंग इंडिया कंपनीचे कार्यालय सील केले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास यंत्रणेने ही कारवाई केली. यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यालय सील केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आपला कर्नाटक दौरा सोडून दिल्लीत परतले.त्यानंतर त्यांनी ही रोखठोक भूमिका मांडली.
ईडीच्या पथकाने दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यासह नॅशनल हेराल्डच्या १६ ठिकाणी छापे टाकले. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.