मुंबई । राज्यसभा निवडणुकीचा निकाल यायला पहाटेचे ३ वाजले होते. तशीच काहीशी स्थिती आता विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीत होणार आहे. परिणामी विधानपरिषदेचा (Legislative Council elections) निकाल देखील लांबण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. कारण भाजपच्या (BJP)दोन आमदारांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. आक्षेप घेणारे पत्र काँग्रेसने (Congress )रिटर्निंग ऑफिसरला दिले आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान प्रक्रियेत दोन्ही बाजूच्या नेत्यांनी काही आक्षेप घेतले होते आणि प्रकरण थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेले होते. त्यामुळे निकाल हा पहाटे आला होता. आता विधानपरिषदेसाठी 20 जून पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत भाजपच्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक (Laxman Jagtap and Mukta Tilak) यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या दोन्ही आमदारांतर्फे त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदान केले आणि मतपत्रिका बॅलेट पेपरमध्ये टाकली.एकप्रकारे गुप्तता भंग झाली आहे. त्यामुळे त्यांचे मत बाद ठरविण्यात यावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
प्रकरण पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ?
मत प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याने ही मतं रद्द करावी असा आक्षेप घेणारे पत्र काँग्रेसने रिटर्निंग ऑफिसरलाच दिले आहे. याबाबत आता रिटर्निंग ऑफिसर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. नेमका काय निर्णय होणार हेही महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा हे संपूर्ण प्रकरण पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊ शकते. त्यामुळे या सर्व प्रक्रिया पाहता या निवडणुकीचाही निकाल लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Congress objection: Cancel BJP’s two votes, Legislative Council result will be delayed!