Shiv Sena will decide who should be the candidate of Shiv Sena. Raje is not in Shiv Sena. Why should he ask for ticket from Shiv Sena, also independent? Asking this question, Shiv Sena MLA from Parbhani Sanjay Jadhav has responded to the allegation made by Sambhaji Raje Chhatrapati regarding the Chief Minister.

Shiv Sena’s reply:… संभाजी राजे छत्रपती हे काही शिवसेनेत नाही!

पुणे ।शिवसेनेचा  उमेदवार कोण असावा, हे शिवसेना ठरवेल. राजे हे काही शिवसेनेत (SHIV SENA ) नाही.त्यांनी शिवसेनेकडूनच का तिकीट मागावे,  तेही अपक्ष? असा सवाल करत शिवसेनेचे परभणीचे आमदार संजय जाधव यांनी संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati)  यांनी मुख्यमंत्र्यांसंदर्भात केलेल्या (Shiv Sena’s reply) आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. 

संभाजी राजे छत्रपती  यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप लावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडून  मला उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. मात्र, तो शब्द त्यांनी मोडला, असे ते म्हणाले. दरम्यान संभाजीराजेंच्या या आरोपानंतर शिवसेनेचे परभणीचे आमदार संजय जाधव (Shiv Sena MLA from Parbhani Sanjay Jadhav)   यांनी संभाजीराजेंवर जोरदार टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती  (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून सुरू असलेल्या राजकारणामुळे राज्यातील  वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेने  पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, अशी अट घातल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी त्याला नकार दिला. आज सकाळी संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेत मी राज्यसभेची निवडणूक लढविणार नाही, असे  जाहीर केले मात्र  मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, असा आरोपीदेखील त्यांनी केला.
त्यावर प्रत्युत्तर देताना आमदार संजय जाधव म्हणाले, शिवसेनेचा (SHIVSENA ) उमेदवार कोण असावा, हे शिवसेना ठरवेल. राजे हे काही शिवसेनेत नाही. त्यांनी शिवसेनेकडूनच का तिकीट मागावे,  तेही अपक्ष? त्यांनी काँग्रेस (CONGRESS) , राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपकडे (BJP) मागावी. तुम्ही ६ वर्ष भाजपचे (BJP) खासदार होते. आत्ता शिवसेनेने तुम्हाला तिकीट का द्यावं? तरीही शिवसेनेने तुम्हाला प्रस्ताव दिला होता की शिवबंधन बांधा. पण तुम्ही तस केले  नाही. एकतर पक्षाचा स्वीकार करायचा नाही आणि परत म्हणायचा आम्हाला दिल नाही. याला अर्थ नाही, अशी टीका जाधव यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *